*विद्यार्थिनींशी शिक्षकाचे अश्लिल वर्तन; पालकांनी धुतले*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*विद्यार्थिनींशी शिक्षकाचे अश्लिल वर्तन; पालकांनी धुतले* 

▪️रत्नागिरी :शहरातील एका नामवंत शाळेत दहावीवीतील विद्यार्थीनिला प्रॅक्टिकल शिकवण्याच्या बहाण्याने अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाला शहर पोलिसांनी अटक केली. शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ही धक्कादायक घटना दि. १३ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १ वा. सुमारास घडली. प्रथमेश चंद्रकांत नवेले (रा. नाचणे, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत पिडीत विद्यार्थीनीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पिडीता ही १० वीमध्ये शिकत असून ९ जानेवारी रोजी दुपारी १ वा. सुमारास शाळेत शेती व पशूपालन या विषयाचे प्रॅक्टिकल सुरु होते. त्यावेळी पिडीतेसह तिच्या मैत्रीणी अशा एकूण तिघीच त्या बॅचला होत्या. प्रॅक्टिकल शिकवण्यासाठी त्या शिक्षकाने गुलाबाच्या फांद्या आणल्या होत्या. त्यांचे कलम कसे तयार करायचे हे शिकवत असताना गुलाबाची रोपे पिशवित लावण्यास सांगितले. तेव्हा पिडीतेच्या दोन्ही मैत्रिणी माती आणण्यासाठी प्रॅक्टिकल रुमच्या बाहेर मैदानात गेल्या होत्या. तेव्हा शिक्षक प्रथमेश नवेलेने पिडीता एकटीच असल्याची संधी साधत तिच्या जवळ जात थांब तुला फांदी कापायला शिकवतो असे म्हणाला.

▪️त्यावर पिडीतेने त्याला नको असे सांगितले. तरीही त्याने पिडीतेचा हात धरुन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच मार्क पाहिजे असतील तर मला खूश ठेवावे लागेल असे म्हणाला. तेव्हा पिडीता घाबरुन प्रॅक्टिकल रुमच्या बाहेर निघून गेली होती. त्यानंतर घाबरल्यामुळे तिने दोन दिवस याबाबत कोणालाही सांगितले नव्हते. अखेर तिला या धक्कादायक प्रसंगामुळे अस्वस्थ वाटू लागल्यावर तिने ११ जानेवारी रोजी हा सर्व प्रकार आपल्या मैत्रिणींना सांगितला. तेव्हा त्यांनीही नवेले सर आपल्या सोबतही असेच अश्लिल प्रकार करत असल्याचे त्यांनी पिडीतेला सांगितले. पिडीतेच्या मैत्रिणीने ही सर्व हकिकत पिडीतेच्या आईला फोनव्दारे कळवल्यानंतर सोमवार १३ जानेवारी रोजी या सर्व विद्यार्थीनींचे पालक शाळेत धकडले. त्यांनी हा सर्व प्रकार शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितल्यानंतर प्रथमेश नवेलेने या सर्व विद्यार्थीनी खोटे बोलत असल्याचा कांगावा करत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पालकांनी संतप्त होत या शिक्षकाला चांगलाच धडा शिकवला. हा प्रकार वार्‍या सारखा शाळेबाहेर पसरला. काही लोकांनी तत्काळ पोलिस यंत्रणेला याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या शिक्षकाला पालकांच्या ताब्यातून सोडवत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या अल्पवयीन मुलींनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

▪️हा शिक्षक गेली पाच वर्ष या शाळेत कार्यरत होता. संस्थेने या घटनेची गंभीर दखल घेत या शिक्षकाला तातडीने शाळेतून काढून टाकले आहे

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

टिप्पण्या