वेलगूर, नवेगाव, शंकरपूर येथे सावित्रीबाईफुले जयंती साजरी
वेलगूर परिसरातील, वेलगुर,नवेगाव व शंकरपूर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली
वेलगुर येथे भीमशक्ती एकता मंडळ वेलगुर यांच्या वतीने जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे भीमशक्ती एकता मंडळाने सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाला पाच वर्षांपूर्वी सुरुवात केली होती. त्या कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन वेलगुर परिसरातील गावांमध्ये कार्यक्रमाला सुरुवात झाली.
वेलगूर येथील इंदिरानगर मध्ये व शंकरपूर मध्ये सावित्रीबाई फुले जयंतीच्या कार्यक्रम घेण्यात आला. त्याप्रसंगी दोन्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अजय भाऊ कंकडालवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गीताताई चालूरकर माजी उपसभापती पंचायत समिती अहेरी, रोहित गलबले ग्रामपंचायत सदस्य वेलगूर, हनुमंत मडावी, अरविंद कन्नाके , राजेश्वर उत्तरवार माजी सरपंच, आशांना दुधी माजी सरपंच
गजभिये भाऊ, तुळशीराम गुरूनुले, तुळशीराम बोरुले, सुधाकर वसाके, मुकुंदा वसाके उपस्थित होते.
कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. मुलींच्या शिक्षणात सावित्रीबाई फुले यांची योगदान काय होते याबद्दल सखोल माहिती देण्यात आली.
वेलगूर येथील कार्यक्रमाचे संचालन व आभार अशोक शिंदे सर यांनी केले
शंकरपूर येथील कार्यक्रमाचे संचालन वआभार दीपक चुनारकर यांनी केले.
नजीकच्या नवेगाव येथे सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा