*रत्नागिरीत ई-वेस्ट कलेक्शनसाठी मेगा ड्राईव्ह*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*


*रत्नागिरीत ई-वेस्ट कलेक्शनसाठी मेगा ड्राईव्ह*
*गौरांग आगाशे; अनबॉक्स, पूर्णम, सामाजिक संस्था एकत्र*


*रत्नागिरी* : दिवसेंदिवस प्लास्टिक कचऱ्याप्रमाणे डिजिटल वस्तूंचा कचरा म्हणजे ई-वेस्ट वाढू लागला आहे. हा कचरा गोळा करण्यासाठी रत्नागिरीमध्ये यंत्रणा उभी करण्याचा निर्णय अनबॉक्स युअर डिझायरने घेतला आहे. याकरिता येत्या २६ जानेवारीला अनबॉक्स, पूर्णम् इकोव्हिजन फाउंडेशन आणि सामाजिक संस्था एकत्र आल्या असून कचरा गोळा केला जाणार आहे, अशी माहिती गौरांग आगाशे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

समाजाचे काही देणे लागतो, हे लक्षात घेऊन गेले अनेक महिन्यांपासून अनबॉक्सतर्फे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्लास्टिक कचरा संकलन आणि जुने कपडे संकलित केले जातात. हे सर्व पुन्हा प्रक्रियेसाठी दिले जाते. या उपक्रमासाठी सुवर्णसूर्य फाउंडेशन, आर्ट सर्कल, कीर्तनसंध्या, टिळक आळी मारूती पिंपळपार देवस्थान, गणेशोत्सव मंडळ, ओम साई मित्रमंडळ यांचेही सहकार्य लाभले आहे.
पूर्णम् इकोव्हिजन फाउंडेशन 10 वर्षे पर्यावरण विषयात पुण्यात काम करत आहे. कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि जास्तीत जास्त लोक सहभागातून शाश्वत विकास या मूलभूत गोष्टीवर फाउंडेशन काम करते. जुन्या कपड्यांपासून नवीन उत्पादने बनवणे आणि त्याची विक्री व्यवस्था केली असून, याला 'परिपूर्णम्' असे नाव दिले आहे.

मेगा ड्राईव्हमध्ये ई-वेस्ट उपक्रमांतर्गत खराब झालेल्या किंवा आपल्याला नको असलेल्या सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल वस्तू गोळा केल्या जातील. त्यावर प्रक्रिया करून ते पुनर्वापरासाठी दिले जातील. २६ जानेवारीला सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ई-वेस्ट गोळा केले जाईल. त्यात अधिकाधिक लोकांचा सहभाग आवश्यक आहे जेणेकरून ई-वेस्ट योग्य ठिकाणी पुनर्प्रक्रियेसाठी देता येईल व त्यापासून होणारे पर्यावरण प्रदूषण रोखता येईल.

*ई- कचऱ्यामध्ये समाविष्ट गोष्टी*
फ्रीज, वॉशिंग मशिन, प्रिंटर, कॉम्प्युटर, माऊस, केबल्स, फॅन्स, लॅपटॉप, मायक्रोवेव्ह, पेनड्राईव्ह, टीव्ही, एसी, डिजिटल कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा, सीडी/डीव्हीडी प्लेयर, मोबाईल फोन, होम थिएटर्स, चार्जर्स, हेडफोन्स आणि इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स वर्किंग, नॉनवर्किंग आणि डिस्पोझेबल वस्तू.. समाविष्ट नसलेल्या गोष्टी-फ्लोरोसंट ट्यूबलाईट्स, इनकॅन्डेसन्ट बल्ब्स, सीएफएल्स.

*संकलन केंद्राची नावे*
अनबॉक्स युअर डिझायर (नाचणे-साळवी स्टॉप लिंक रोड), आगाशे फूडकोर्ट (छत्रपती संभाजीनगर), सावंत रोडलाईन्स (साळवी स्टॉप), धन्वंतरी मेडिकल (मारूती मंदिर), अभिजित करंबेळकर (शांतीनगर), सुवर्णसूर्य फाउंडेशन (शेरेनाका), मानस किराणा स्टोअर (माळनाका), डी. के. जोशी ॲड सन्स (जिल्हा परिषद), आर्यक सोल्युशन्स (रमेश नगर), अनिकेत कोनकर (खेडशी), हॉटेल सी फॅन्स (मांडवी), हर्ष दुडे (कारवांचीवाडी), खादाडी कट्टा (जोशी पाळंद), चिट चॅट क्लब (थिबा पॉईंट).
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

Comments