*'किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता' जिल्ह्यातील तृतीयपंथीयांचा पहिला बचत गट* समाजकल्याण विभागाचे भक्कम पाठबळ - सहाय्यक आयुक्त दीपक घाटे

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*'किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता' जिल्ह्यातील तृतीयपंथीयांचा पहिला बचत गट*
 समाजकल्याण विभागाचे भक्कम पाठबळ - सहाय्यक आयुक्त दीपक घाटे


 'किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता' हा जिल्ह्यातील पहिला बचत गट स्थापन करुन, समाजाबरोबर येण्याचे पहिले पाऊल टाकण्यात आले आहे. समाज कल्याण विभागांच्या सर्व योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. समाज कल्याण विभाग निश्चितच अशा उपक्रमास भक्कम पाठबळ देईल, अशी ग्वाही समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली.
    
केंद्र व राज्य शासन पुरस्कृत दिनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान रत्नागिरी नगरपरिषद अंतर्गत किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता बचत गट या जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथीयांच्या बचत गटाची स्थापना काल झाली. यावेळी शहर अभियान व्यवस्थापक संभाजी काटकर, समुदाय संघटक सारिका मिरकर, संपदा सावंत, माजी नगरसेवक सुहेल मुकादम, अश्फाक गारदी, जान्हवी जाधव, शिवानी पवार, हेमाली कीर, निकीता जगताप, मानसी शिरवाडकर, श्रध्दा शिंदे, दुर्गा सावंत, विद्या गोठणकर, सान्वी कांबळे, किन्नर समुदायाच्या गुरु निता केने, रेणुका चव्हाण, अनुराधा चव्हाण उपस्थित होते.              
   
अध्यक्षीय भाषणात जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते म्हणाले, हा बचत गट स्थापन करत राज्यात इतर जिल्ह्यांसाठी आदर्शवत पाऊल टाकण्यात आले आहे. या निमित्ताने उपेक्षित असणारा वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडला जात आहे.  भविष्यकाळातही सगळ्यांच्या सोबतीने निश्चितच प्रेरणादायी काम करु या. प्रशासनाच्या माध्यमातून  विविध समस्या सोडविण्यासाठी सर्वजण आपल्या सोबत असतील.
 
माजी नगरसेवक श्री. मुकादम  यांनीही विविध योजना राबविण्यासाठी आणि विविध व्यवसायांसाठी भक्कम आधार‍ दिला जाईल, असे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पुजन आणि दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. श्री. गारदी आणि श्रीमती मिरकर यांनी यावेळी प्रस्तावना केली. बचत गटाच्या अध्यक्ष पल्लवी परब आणि माऊ कदम यांनी स्वागत केले. शेवटी पल्लवी परब यांनी सर्वांचे आभार मानले. संपदा सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments