"विस्तारवाद नाही, विकासवादाच्या भावनेने काम सुरू", मुंबईत युद्धनौका आणि पाणबुडीचे उद्घाटन केल्यानंतर मोदींची प्रतिक्रिया!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
"विस्तारवाद नाही, विकासवादाच्या भावनेने काम सुरू", मुंबईत युद्धनौका आणि पाणबुडीचे उद्घाटन केल्यानंतर मोदींची प्रतिक्रिया!*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील माझगांव डॉक येथे 'आयएनएस सूरत', 'आयएनएस निलगिरी' या युद्धनौकांचे आणि 'आयएनएस वाघशीर' या पाणबुडीचे जलावतरण करण्यात आले. दोन युद्धनौका व एका पाणबुडीचे एकाचवेळी जलावतरण होणे, ही भारताच्या संरक्षण क्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. 'आयएनएस' सूरत ही सर्वांत मोठी आणि अत्याधुनिक विनाशिका आहे.
ही क्षेपणास्त्रवाहू (पी१५बी गाईडेड मिसाईल) प्रकल्पातील चौथी आणि शेवटची विनाशिका आहे. यामध्ये ७५ टक्के तंत्रज्ञान स्वदेशी आहे. 'आयएनएस निलगिरी' ही (पी१७ए स्टेल्थ फ्रिगेट) या अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रकल्पातील पहिली युद्धनौका आहे.
'आयएनएस वाघशीर' ही (पी७५ स्कॉर्पियन) प्रकल्पातील सहावी पाणबुडी असून फ्रान्सच्या सहकार्यातून ती बनविण्यात आली आहे. या जलावतरणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी संवादही साधला.*
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'देशाच्या संरक्षणासाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या प्रत्येकाला मी नमन करतो. भारताच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्या वीरागणांना मी शुभेच्छा देतो. आज भारताच्या समुद्री वारसा नेव्हीच्या गौरवाशाली इतिहास आणि आत्मनिर्भर भारत अभियानासाठी मोठा दिवस आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी नौसेनेला नवं सामर्थ्य दिलं होतं, नवं व्हिजन दिलं होतं. आज त्यांच्याच पावन भूमीवर २१ व्या शतकात नौसेनेला सशक्त करण्यासाठी आम्ही मोठं पाऊल उचलत आहोत. हे पहिल्यांदा होतंय, जेव्हा एक डिस्ट्रॉयर, फ्रिगेट आणि सबमरिन तिघांना एकत्र कमिशन केलं जात आहे.'
'सर्वात गर्वाची गोष्ट हे की तिन्ही नौका मेड इन इंडिया आहेत. मी भारतीय नौसेना, कारागिर, श्रमिक आणि अभियांत्रिकांना शुभेच्छा देतो.
आजचा कार्यक्रम आमच्या गौरवशाली वारशाला भविष्यातील आकांक्षाशी जोडतो. मोठ्या समुद्री यात्रा, कॉमर्स, शिप इंडिस्ट्री, डिफेन्स याला समुद्री इतिहास आहे. आपल्या इतिहासाकडून प्रेरणा घेऊन आजचा भारत मेजर मेरिटाईम पॉवरबनत आहे', असं मोदी म्हणाले.
*समुद्राच्या विकासासाठी सागराचा मंत्र*
आज भारत पूर्ण विश्व ग्लोबल साऊथमध्ये विश्वासू आणि जबाबदारीच्या मित्राच्या नात्याने ओळखता जातो. भारत विस्तारवाद नाही तर विकासवादाच्या भावनेने काम करतो.
भारताने नेहमी खुले, सुरक्षित, इन्क्लुझिव्ह, पॉस्परस इंडो पॅसिफिक रिजनचं समर्थन केलं आहे. समुद्राच्या विकासाची गोष्ट आली तेव्हा भारताने मंत्र दिला सागर… सागराचा अर्थ, सिक्युरिटी अॅण्ड ग्रोथ फॉर ऑल इन दि रिजन.
भारतासमोर जी २० अध्यक्षपद आलं तेव्हा जगाला आम्ही मंत्र दिला वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्यूचर. जेव्हा करोनोशी लढत होते, तेव्हा भारताने व्हिजन दिलं वन अर्थ, वन हेल्थ. आम्ही संपूर्ण विश्वाला परिवार मानतो', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
Comments
Post a Comment