*थिबा पॅलेस झाडे तोड प्रकरणी मनसे आक्रमक.*
ब्रेकिंग
8 तारखेला मनसे करणार
खळखट्याक!!
*कारवाई न केल्यास 8 जानेवारी बुधवारी मनसे स्टाईल कारवाई चा इशारा.*
थिबा पॅलेस परिसरात खाजगी विकासकामार्फत कामं सुरु केले आहे. सदर जागेवर आरक्षण आहे तो विषय वेगळाच पण हरित पट्टा असलेल्या जागेतील झाडे तोड ची परवानगी कोणी व कशी दिली?
.यावर बोट ठेवत रत्नागिरी मनसेने या विरोधात दंड थोपाटले आहे व प्रशासक तुषार बाबर यांना याबाबत जाब विचारताना म्हटले आहे की,
थिबा राजावाडा ते थिबा पॉईंट दरम्यान निसर्गसौन्दर्य संपन्न असलेल्या परिसरात एका खासगी विकासकाने विकासक बांधकाम उद्देशाने हरित पट्टा आरक्षित असलेल्या भागातील अनेक दुर्मिळ वृक्षाची बेसूमार कत्तल केली आहे.
ही कत्तल कोणाच्या परवानगीने झाली? यां साठी आपणास अवगत केले होते का? हा प्रकार कोणाला दिसू नये म्हणून सदर परिसर पत्रे लावून बंदिस्त केला आहे.
कोणाच्या परवानगीने हा निसर्ग संपन्न परिसर बंदिस्त केला आहे? समस्त रत्नागिरीकर व येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्वणी असलेला हा परिसर का बंदिस्त केला गेला? जगप्रसिद्ध थिबा राजावाडा, जिल्हाधिकारी, जी पं मुख्याधिकारी इत्यादी सह अनेक महत्वाच्या अधिकार्याचे निवासस्थान असलेल्या परिसरातील वृक्ष कत्तली एकही अधिकारी किंवा न पं कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येऊ नये? आश्चर्य आहे.
हा सगळा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करणार नाही.
हे सर्व कामं थांबवून सर्व पत्रे हटवून तो परिसर पुन्हा मोकळा केला पाहिजे तसेच जेवढी वृक्ष तोड झाली आहे त्यांची शासन नियम प्रमाणे दंड आकारणी व तात्काळ वसुली तत्काळ झाली पाहिजे अन्यथा येणाऱ्या बुधवारी 8 जानेवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल ने ते पत्रे हटवून तो परिसर रिकामा करेल. असा इशारा देखील देण्यात आला आहे. यां प्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर,मा.तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, कामगार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर,रुपेश चव्हाण,सतीश खामकर, गजानन आहिर, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
एकंदरीत गेल्या काही दिवसांतील मनसेने अनेक विषय आक्रमकपणे मांडलेल्या पहाता हा विषय गाजणार असे दिसतेय.
Comments
Post a Comment