*7 महिन्याच्या बाळाला सोडून विवाहिता बेपत्ता, घरातील सोने व रोख रक्कमही गायब*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*7 महिन्याच्या बाळाला सोडून विवाहिता बेपत्ता, घरातील सोने व रोख रक्कमही गायब*
७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर महिला तिच्यासोबत घरातील सोन्याचे दागदागिने व रोख रक्कमही घेऊन गेली आहे. महिला अचानक बेपत्ता झाल्याने कुटूंबीय चिंतेत पडले असून नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ही घटना चिखली ता. मोहोळ येथे घडली. अक्षदा आकाश गुंड असे या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश तानाजी गुंड हे गेल्या अनेक वर्षापासून चिखली येथे आई, पत्नीसह वास्तव्यास आहेत. दोन वर्षापूर्वी कर्नाटक राज्यातील धर्मपल्ली येथील अक्षदा नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला आहे. या दाम्पत्यांना ७ महिन्याचा लहान मुलगा आहे.
दि.१६ रोजी आकाश आणि त्याची आई रोजंदारीवर कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले होते. कामावरून घरी आल्यानंतर त्यांना अक्षदा घरी दिसली नाही. त्यांनी इकडे तिकडे शोधाशोध केली, त्यावेळी त्यांना त्यांच्या शेजारील नातेवाईकांच्या घरी मुलाला सोडून जनावरांना पाणी वैरण करून येते असे सांगून गेली असल्याचे समजले. दरम्यान, त्यांनी थोडावेळ वाट पाहिली मात्र ती घरी परतली नसल्याने घरात ठेवलेले सोने आणि पैसे आहेत का हे पाहीले असता, घरातील सोने व रोख रक्कम गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांना कोणालाही काहीही न सांगता अक्षदा घरातुन निघून गेल्याची खात्री झाली.
दरम्यान सात महिन्याच्या छोट्या बाळालाही घरीच सोडून निघून गेल्याने या घटनेचे गुढ वाढले आहे. ही घटना घडल्यानंतर गुंड कुटुंबीयांनी तिची शोधाशोध केली. मात्र, अक्षदाचा कोठेही थांगपत्ता लागत नसल्याने (दि.१७) महिला घरातून गायब झाल्याची तक्रार आकाश गुंड यानी मोहोळ पोलिसात दिली आहे.
पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला असून, सदर महिलेची कोणाला माहिती मिळाल्यास अथवा कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी मोहोळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
Comments
Post a Comment