*राष्ट्रीय महामार्ग 66 चौपदरीकरण :19 खोकेधारकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मोबदला वाटप*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*राष्ट्रीय महामार्ग 66 चौपदरीकरण :19 खोकेधारकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मोबदला वाटप*
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 भूसंपादन प्रक्रियेमध्ये रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या शासकीय जागेमधील 19 खोकेधारकांना पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते एकूण 67 लाख 35 हजार 545 मोबदल्यांचे धनादेश वाटप करण्यात आले. शासकीय विश्रामगृहात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या कामाची सुरुवात सन 2014 पासून झाली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गामध्ये रत्नागिरी तालुक्यातील 12 गावांचा समावेश असून संगमेश्वर तालुक्यामधील 22 गावांचा समावेश आहे. भूसंपादन प्रक्रियेमध्ये रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्या खातेधारकांना त्यांच्या जमिनीचा तसेच जमिनीवरील त्यांच्या मालकीच्या संसाधनांचा मोबदला देण्यात आलेला आहे. परंतु रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व भूसंपादनामध्ये बाधित होणाऱ्या शासकीय जागेमधील खोकेधारकांना कोणत्याही प्रकारचा मोबदला शासनाकडून देण्यात आलेला नव्हता. त्यामूळे या खोकेधारकांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग, बांधकाम विभाग, भूमी अभिलेख विभाग यांची बैठक घेवून संबंधित खोकेधारकांची पहाणी करुन मोबदला देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिल्या. त्याअनुषंगाने पालकमंत्री श्री. सामंत यांनी वारंवार बैठका घेवून आढावा घेतला.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी देखील संबंधित विभागांची वेळोवेळी बैठक घेवून संबंधित खोकेधारकांना मोबदला मिळवून देण्याबाबत पाठपुरावा केला. राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी देखील मुंबई येथे संबंधित सर्व विभागांची बैठक घेवून नुकसानग्रस्त खोकेधारकांना मोबदला मिळवून देण्याबाबत सकारात्मक सूचना दिल्या. आमदार किरण सामंत यांनी देखील बांधकाम भवन, मुंबई येथे बैठक घेवून खोकेधारकांना मोबदला देण्याबाबत होत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला.
संगमेश्वर तालुक्यांमधील 9 गावांमधील 80 खोकेधारकांपैकी 23 खोकेधारकांचा मोबदला शासनाकडून मंजूर करण्यात आला असून त्याचा निधी उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्राप्त झाला आहे. उर्वरित खोकेधारकांचा मोबदला लवकरच मंजूर होऊन त्यांना देखील मोबदला वाटपाची कार्यवाही करण्यात येईल.
आज 19 खोकेधारकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाद्वारे मोबदला वाटप करण्यात आला त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
कीर्ती राजेंद्र कुळये, जयंत बाळकृष्ण कुलकर्णी, प्रज्ञा प्रसाद कुलकर्णी, संतोष जयसिंग आंबोरे, दत्तात्रय विश्राम आंबवकर, बाळकृष्ण बाबू बामणे, मनोहर वसंत कुंभार, दिलीप कृष्णा पेंढारी, प्रकाश बाळ घडशी, विजय यशवंत गीते, अनंत सखाराम वेलवणकर, पुरुषोत्तम गुणाजी घडशी, मनोहर सोनू गीते, श्रीकांत टोलू घडशी, संजय अनंत घडशी, मंगेश सोमा सीतप, गणपत मुगू खापरे, मनोहर शांताराम रेडीज, विनायक अनंत रहाटे
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा