भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पत्नी सुहासी रवींद्र चव्हाण यांच्याकडून 5 लाखाची अखिल मराठा महासंमेलनासाठी भरीव मदत

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पत्नी सुहासी रवींद्र चव्हाण यांच्याकडून 5 लाखाची 
अखिल मराठा महासंमेलनासाठी  भरीव मदत

रत्नागिरी :-- रत्नागिरीत प्रथमच होणाऱ्या अखिल मराठा महासंमेलनासाठी सुहासी रविंद्र चव्हाण आणि भाजपाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांनी भरीव मदत केली आहे. आयोजक मराठा मंडळाकडे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी ही मदत आज सुपुर्द केली.

येत्या १८ व १९ जानेवारीला माळनाका येथील मराठा मैदानावर हे महासंमेलन होणार आहे. ५७ क्षत्रिय मराठा मंडळे, संस्थांचे फेडरेशन २०१५ साली तयार करण्यात आले. त्यानंतर दोन महासंमेलने यशस्वीपण आयोजित केली. तिसरे महासंमेलन रत्नागिरीत होत आहे. याकरिता मराठा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार रविंद्र चव्हाण यांची रत्नागिरीत गेल्या महिन्यात भेट घेतली होती. 

 तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रणही दिले होते. या महासंमेलनाकरिता मदतीचे आश्वासन आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिले होते. ही मदत श्री. चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांच्या माध्यमातून प्राप्त झाली.

ही मदत आज मराठा फेडरेशनचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे व सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दक्षिण रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सुपुर्द केली. या वेळी भाजपा मंडल अध्यक्ष विवेक सुर्वे व दादा दळी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संकेत कदम, विनोद सावंत, नीलेश आखाडे, सुशांत पाटकर, संदीप सुर्वे, गिरीधर पटवर्धन, अरविंद मोरे, समीर सावंत आदी उपस्थित होते.

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

टिप्पण्या