*मनू भाकर आणि डी गुकेश यांना राष्ट्रपतींनी केले खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, तर 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*मनू भाकर आणि डी गुकेश यांना राष्ट्रपतींनी केले खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, तर 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार*
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज (17 जानेवारी) भारतीय क्रिडा क्षेत्रातील दिग्गज खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते खेळाडूंना खेलरत्न व अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रपतींद्वारे ऑल्मिपिक पदक विजेती नेमबाज मनु भाकर, जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजयी ठरलेला डी गुकेश, भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंह आणि पॅरा अॅथलीट प्रवीण कुमार या 4 खेळाडूंचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. भारतासाठी पहिले पॅराल्मिपिक सुवर्णपदक जिंकणारे मुरलीकांत पेटकर यांचा अर्जुन पुरस्काराने (आजीवन) सन्मान करण्यात आला.
या 4 खेळाडूंव्यतिरिक्त 32 इतर खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय, राष्ट्रपती मुर्मू यांनी अर्जुन पुरस्कार (आजीवन), राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित आणि आजीवन) आणि मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफीच्या विजेत्यांनाही सन्मानित केले.
22 वर्षी मनु भाकरने पॅरिस ऑल्मिपिकमध्ये नेमबाजी स्पर्धेत दोन कांस्यपदकांवर नाव कोरण्याची कामगिरी केली होती. याशिवाय, 18 वर्षीय डी गुकेश हा जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेता ठरला आहे. टोकियो आणि पॅरिस ऑल्मिपिकमध्ये भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक मिळाले होते. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंहने केले होते. तसेच, पॅरिस पॅराल्मिपिकमध्ये पुरुषांच्या हाय जंप-टी64 स्पर्धेत प्रवीण कुमारने सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली होती. या चारही खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
खेलरत्न पुरस्कारांतर्गत खेळाडूंना मेडल, प्रशस्तीपत्र आणि 25 लाख रुपये बक्षीस दिले जाते. तर अर्जुन पुरस्कारांतर्गत खेळाडूंना 15 लाख रुपये, अर्जुनची मूर्ती आणि प्रशस्तीपत्र दिले जाते.
*मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित खेळाडू*
मनु भाकर (नेमबाजी)
डी गुकेश (बुद्धिबळ)
हरमनप्रीत सिंग (हॉकी)
प्रवीण कुमार (पॅरा अॅथलेटिक्स)
*अर्जुन पुरस्काराने सन्मानित खेळाडू*
ज्योति याराजी (अॅथलेटिक्स)
अन्नू रानी (अॅथलेटिक्स)
नीतू (बॉक्सिंग)
स्वीटी (बॉक्सिंग)
वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
सलीमा टेटे (हॉकी)
अभिषेक (हॉकी)
संजय (हॉकी)
जरमनप्रीत सिंग (हॉकी)
सुखजीत सिंग (हॉकी)
राकेश कुमार (पॅरा नेमबाजी)
प्रीति पाल (पॅरा अॅथलेटिक्स)
जीवनजी दीप्ति (पॅरा अॅथलेटिक्स)
अजीत सिंह (पॅरा अॅथलेटिक्स)
सचिन सरजेराव खिलारी (पॅरा अॅथलेटिक्स)
धरमबीर (पॅरा अॅथलेटिक्स)
प्रणव सूरमा (पॅरा अॅथलेटिक्स)
एच होकाटो सेमा (पॅरा अॅथलेटिक्स)
सिमरन जी (पॅरा अॅथलेटिक्स)
नवदीप (पॅरा अॅथलेटिक्स)
नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन)
तुलसीमथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)
नित्या सुमति सिवान (पॅरा बॅडमिंटन)
मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)
कपिल परमार (पॅरा जूडो)
मोना अग्रवाल (पॅरा शूटिंग)
रुबीना फ्रांसिस (पॅरा शूटिंग)
स्वप्निल सुरेश कुसाले (शूटिंग)
सरबजोत सिंह (शूटिंग)
अभय सिंह (स्क्वॅश)
साजन प्रकाश (जलतरण)
अमन (कुस्ती)
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
Comments
Post a Comment