*ड्रग्जच्या वादातून 14 वर्षीय वर्गमित्राची हत्या; मृतदेह झुडुपात फेकला*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*ड्रग्जच्या वादातून 14 वर्षीय वर्गमित्राची हत्या; मृतदेह झुडुपात फेकला*
पेण येथील एका 14 वर्षांच्या शालेय विद्यार्थ्याची त्याच्या 15 वर्षांच्या वर्गमित्राने ड्रग्जच्या वादातून हत्या केली. सदर मुलाला ताब्यात घेऊन रिमांड होममध्ये पाठवण्यात आले आहे. या अल्पवयीन आरोपीने मुलाचा मृतदेह झुडपात फेकला होता. पेण पोलिसांनी 50 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करून तसेच पीडित मुलाच्या चार मित्रांची चौकशी करून हत्येचा गुन्हा उलगडला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी पेण नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना आंबेडकर शाळेजवळ एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळला. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. अधिक तपासात पोलिसांना आढळले की, मृत व्यक्ती पेणमधील फणसडोंगरी येथील बांगड्या विक्रेत्याचा मुलगा गणेश बाळू चुनारे आहे. रायगड पोलिसांचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी सांगितले की, आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि मृत मुलगा त्याच्या दुसऱ्या मित्रासोबत शेवटचा दिसला होता असे आढळले. त्यानंतर मित्राची चौकशी केली असता, त्याने घटना कथन केली.
मृत गणेश चुनारे हा आठवीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी होता. त्याच्या मोठ्या भावाचा काही वर्षांपूर्वी अतिमद्यपानामुळे मृत्यू झाला होता. तो त्याच्या पालकांसह आणि लहान बहिणीसोबत राहत होता. प्राप्त माहितीनुसार, पीडित आणि आरोपी नियमितपणे ड्रग्ज सेवन करण्यासाठी शाळा बुडवायचे. ते दोघेही आठवीत शिकत होते.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी आणि पीडितेच्या काही जवळच्या मित्रांची चौकशी करणाऱ्या स्थानिक पेण पोलिसांनी असे निष्कर्ष काढले की, त्यांच्यात आणखी काही व्यसनाधीन पदार्थ मिळविण्यावरून तसेच पैसे मागण्यावरून जोरदार वाद झाला होता. यावेळी अल्पवयीने आरोपीने पीडित मुलाच्या डोक्यावर काहीतरी जड वस्तूने वार केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. नंतर घाबरल्याने त्याने त्याचा मृतदेह एका निर्जन जागेत फेकून दिला.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
Comments
Post a Comment