*100 दिवस कृती आराखडा आढावा बैठक**सर्वसामान्य जनतेचे काम झाले पाहिजे**तक्रारींचे निवारण करा --- पालक सचिव सीमा व्यास*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*100 दिवस कृती आराखडा आढावा बैठक*
*सर्वसामान्य जनतेचे काम झाले पाहिजे*
*तक्रारींचे निवारण करा --- पालक सचिव सीमा व्यास*
*रत्नागिरी: --आपण सर्वजण शासकीय नोकर आहोत. येणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे काम  झाले पाहिजे, त्यासाठी सर्वांनी सकारात्मक भावना ठेवाव्यात. आलेल्या तक्रारींचे निवारण सकारात्मकतेने करा, असे निर्देश पालक सचिव तथा अप्पर मुख्य सचिव (साप्रवि) सीमा व्यास यांनी दिले.*
            जिल्हा नियोजन समिती सभागृहात 100 दिवस कृती आराखड्यासंदर्भात श्रीमती व्यास यांनी आज आढावा बैठक घेतली.

   बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.
            आढावा घेतल्यानंतर पालक सचिव श्रीमती व्यास म्हणाल्या, सर्वांनी चांगले सादरीकरण केले आहे. इथली टीम चांगलं काम करत आहे. 

त्याबद्दल तुमच्या सर्वांचे अभिनंदन. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या या कृती आराखड्याचा गुड गव्हर्नन्साठी प्राधान्याने अंमलबजावणी करावी. सर्वसामान्य जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी आपण शासकीय नोकर आहोत. सकारात्मतक विचार करुन, येणाऱ्या जनतेची कामे झाली पाहिजेत, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. 

 कार्यालयातील वातावरण आनंदी, प्रसन्न असले पाहिजे. मानसिक, शारीरिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी योगा मेडिटेशन यासारखे कार्यक्रम घ्यावेत. स्वत:ची काळजीही घ्यावी, असेही  त्या म्हणाल्या.
            जिल्हाधिकारी श्री. सिंह, पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार यांच्यासह विविध विभागप्रमुखांनी 7  कलमी कृती कार्यक्रमावर आधारित 100 दिवस कृती आराखडा याविषयी संगणकीय सादरीकरण केले.
            जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी पुष्पगुच्छ आणि 'विकास पर्व' देऊन सुरुवातीला पालक सचिव श्रीमती व्यास यांचे स्वागत केले. राजापूर उपविभागीय अधिकारी डॉ. जस्मिन यांनी आभार प्रदर्शन केले.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

टिप्पण्या