*100 टक्के धान्य वितरण करा; पुरवठा विभागाच्या बैठकीत मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*100 टक्के धान्य वितरण करा; पुरवठा विभागाच्या बैठकीत मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश*
डिसेंबर महिन्यातील धान्य वितरणाच्या अनुषंगाने राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे ॲक्शन मोडवर आले आहेत. डिसेंबर महिन्यात राज्यात प्राप्त नियतनाच्या एकूण 92.09 % धान्याचे वितरण झाले असून, उर्वरित वितरणामध्ये आलेल्या अडचणींच्या अनुषंगाने शुक्रवारी धनंजय मुंडे यांनी संपूर्ण राज्याच्या पुरवठा विभागाची व्हीसीद्वारे बैठक घेतली. ई – पॉस मशीन वरील अडचणी, पोर्टलचे सर्वर डाऊन, यांसह विविध अडचणींची तसेच धान्य वितरणाची जिल्हानिहाय वस्तुनिष्ठ आकडेवारी धनंजय मुंडे यांनी त्या-त्या जिल्ह्याच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
ठाण्यात सर्वाधिक ९८.५९ तर धुळे जिल्ह्यात सर्वात कमी 81.69% इतके धान्य वितरण डिसेंबर महिन्यात झाले असून ही आकडेवारी शंभर टक्क्यांकडे घेऊन जाण्यासाठी ऑनलाईन आणि अन्य तांत्रिक अडचणी दूर करण्यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी विभागाला निर्देश दिले आहेत. या संदर्भात सर्व संबंधितांची पुढील आठवड्यात आणखी एक बैठक घेणार असल्याचे मुंडे यांनी विभागाला सूचित केले.
सर्वर डाऊन असणे, किंवा अन्य कारणांनी ज्या-ज्या जिल्ह्यांमध्ये विविध योजनेतील लाभार्थींना धान्य वितरण डिसेंबर महिन्यात होऊ शकले नाही, त्यांना या महिन्यांमध्ये मुदतवाढ देण्याबाबतचे प्रस्ताव तातडीने देण्याबाबतही मुंडे यांनी संबंधित जिल्ह्यांना निर्देश दिले आहेत.
भंडारा जिल्ह्यातील उर्वरित साखर उपलब्ध करून देणे त्याचबरोबर नागपूर विभागातील पुरवठा निरीक्षक व अन्य रिक्त पदे भरून देण्याबाबतचा प्रस्ताव देखील स्वतंत्ररीत्या मागवण्याबाबत धनंजय मुंडे यांनी संबंधितांना या बैठकीत निर्देश दिले आहेत. एफसीआयकडे विविध करार दिले असून अन्य मागण्यांच्या अनुषंगाने पुढील आठवड्यातील बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल, असेही धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले.
विविध जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी धान्याचे रॅक उतरवले जातात, त्या भागातील रस्ते व अन्य सुविधांच्याबाबतही स्वतंत्र आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असेही धनंजय मुंडे म्हणाले आहेत. ई – पॉस मशीनवर डेटा उपलब्ध करून देणे, सर्वर डाऊनच्या समस्या यासह सर्वच्या सर्व तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्यासंदर्भात मंत्री मुंडे यांनी स्वतंत्र निर्देश दिले आहेत.
या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव, उपसचिव, शिधावाटप संचालनालयाचे नियंत्रक, पुरवठा विभागाचे सर्व उपयुक्त तसेच राज्यातील सर्व जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी आणि उपनियंत्रक आदी उपस्थित होते.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment