*10 लाखांच्या नकली नोटा जप्त; 5 जणांना बेड्या*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*10 लाखांच्या नकली नोटा जप्त; 5 जणांना बेड्या*        

 पुणे सातारा रस्त्यावरून एक इसम पोलिसांना पाहून गडबडीत चालला होता. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे 500 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या होत्या. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच गुन्ह्यातील 5 आरोपींना सहकार नगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 लाख 35 हजार रुपये किंमतीच्या 2070 नकली नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत.

निलेश हिरानंद विरकर (वय 33, रा. विष्णु गावडे चाळ रेल्वे रिझर्व्हेशन सेंटर जवळ चिंचवड स्टेशन), सैफान कैयुम पटेल (वय 26,रा. सेक्टर 12 ई सत्तार पडन बिल्डींग कोपर खैरने नवी मुंबई), अफजल समसुद्दीन शहा (वय 19, रा. सेक्टर 12 ई झमझम अपार्टमेंट कोपर खैरने नवी मुंबई), शाहीद जक्की कुरेशी (वय 25, रा. सेक्टर 12 ई झमझम अपार्टमेंट दुसरा मजला घर नं.202 कोपर खैरने नवी मुंबई) व शाहफहड ऊर्फ सोनु फिरोज अंसारी (वय-22, रा. जन्मत वेल्फेअर सोसायटी मीना अपार्टमेंट चौथा मजला रुम नं. 411 साडी कंपाऊंड नालासोपारा पुर्व पालघर ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पोलिसांना पुणे सातारा रस्त्यावर आरोपी निलेश विरकर हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे 500 रुपयांच्या 250 नकली नोटा आढळून आल्या. तसेच निलेश विरकर याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवुन नकली नोटा चलनात चालवीत असल्याची कबुली पोलिसांना दिली होती. याप्रकरणी निलेश विरकर याच्यावर सहकार नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 180 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांनी आरोपी निलेश विरकर याच्याकडे अधिक चौकशी केली असता, आरोपीने नकली नोटा या शाहीद कुरेशी, सैफान पटेल, अफजल शहा व शाहफहड ऊर्फ सोनु फिरोज अंसारी यांच्याकडून आणल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वरील चारही आरोपींना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून 10 लाख 35 हजार रुपये किंमतीच्या 500 रुपये दराच्या 2070 नकली नोटा जप्त केल्या आहेत.

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

Comments