रत्नागिरीतील कै. शामराव पेजे सभागृहात आयोजित PMFME व स्मार्ट प्रकल्पांतर्गत जिल्हा अंमलबजावणी कक्ष रत्नागिरी व सिंधुदुर्ग मार्फत जिल्हास्तरीय कार्यशाळा व खरेदीदार-विक्रेता संमेलनाला(Buyer-Seller Meet) शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) व मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत जिल्हा अंमलबजावणी कक्ष रत्नागिरी व सिंधुदुर्ग मार्फत शुक्रवार, दि. २७/१२/२०२४ रोजी रत्नागिरी येथील कै. शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा व खरेदीदार-विक्रेता संमेलनाचे (Buyer-Seller Meet) आयोजन करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत १२ खरेदीदार (Buyer), ४० प्रक्रियाधारक (Seller) व स्मार्ट प्रकल्पातंर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ मान्यता प्राप्त समुदाय आधारित संस्थानी सहभाग नोंदवला. योजनेंतर्गत मंजूर झालेल्या प्रक्रियाधारकांनी उत्पादीत केलेल्या मालाचे स्टॉल लावण्यात आले. सदर संमेलनाचे उद्‌घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय कृषी सहसंचालक श्री. अंकुश माने, कोकण विभाग ठाणे, यांच्या हस्ते करण्यात आले. विभागीय नोडल अधिकारी, स्मार्ट प्रकल्प कोकण विभाग, ठाणे श्री भीमाशंकर पाटील यांनी स्मार्ट प्रकल्पाचे सादरीकरण केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा, रत्नागिरी श्री शिवकुमार सदाफुले, यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना व स्मार्ट प्रकल्प बावत प्रास्ताविक केले. श्री लक्ष्मण खुरकुटे नोडल अधिकारी, जिल्हा अंमलबजावणी कक्ष रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांनी दोन्ही जिल्ह्यातील शेतमाल पिके खरेदी विक्री व्यवसायास असणारा वाव याबाबत माहिती दिली तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुदाय आधारित संस्थांचा तसेच उपस्थित असलेल्या खरेदीदारांचा परिचय करून दिला.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना संदर्भात श्री. निलेश निकम, मास्टर ट्रेनर, PMFME यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री. अंबरीश मिस्त्री, जिल्हा अग्रणी बँक बँक ऑफ इंडिया रत्नागिरीचे प्रतिनिधी श्री. संकेत लेंडे व रोहित सुर्वे यांनी योजनेसाठी लागणाऱ्या बँकेच्या आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले. तसेच उपविभागीय कृषी अधिकारी रत्नागिरी, श्री. फिरोज शेख, यांनी एग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड व PMFME योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली.

सदर संमेलनात काजू, आंबा, फणस, इ. फळपिकांचे खरेदीदार व विक्रेत्यांचे सर्वांसमक्ष एकूण सात सामंजस्य करार करण्यात आले.

सदर संमेलनास रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी फलोत्पादन श्री. प्रमोद पाटील, क्षेत्रीय अधिकारी PMFME श्री. अक्षय सनगर व पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मयूर काशीद यांनी केले तर पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ श्री अमीर डांगे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, रत्नागिरी व प्रकल्प अंमलबजावणी कक्ष रत्नागिरी व सिंधुदुर्ग कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास एकुण ११५ लोकांनी सहभाग नोंदवला.

Comments