निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे श्री.संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

आबलोली (संदेश कदम) 
गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे श्री.संत जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री. संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन, दीपप्रज्वलीत करुन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी निर्मल ग्रामपंचायत आबलोलीचे ग्रामविकास अधिकारी श्री. बाबूराव सुर्यवंशी, पत्रकार श्री. अमोल पवार यांनी श्री. संत जगनाडे महाराज यांच्या कार्याबद्दल मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, तेली समाजोन्नती संघ गुहागर या संघाचे माजी तालुका अध्यक्ष श्री. शशिकांत पवार, ग्रामविकास अधिकारी श्री. बाबूराव सुर्यवंशी, पत्रकार श्री. अमोल पवार, पत्रकार श्री. संदेश कदम, आशा स्वयंसेविका सौ. विशाखा कदम, सौ. सानिध्या रेपाळ, योगेश भोसले,आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments