*जिल्हा परिषद रत्नागिरी आणि रेनट्री फाउंडेशन यांच्यात सर्वसमावेशक विकासासाठी सामंजस्य करार*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*जिल्हा परिषद रत्नागिरी आणि रेनट्री फाउंडेशन यांच्यात सर्वसमावेशक विकासासाठी सामंजस्य करार*
रत्नागिरी:-जिल्हा परिषद रत्नागिरी आणि रेनट्री फाउंडेशन यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि एकात्मिक विकासासाठी पर्यावरण संरक्षण, जलसंधारण विकास, ग्रामीण उपजीविका आणि समाजकल्याण याक्षेत्रांमध्ये एकत्र काम करण्यासाठी आज सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या उपक्रमात सर्वसमावेशक विकास आणि मानसिक आरोग्यावर विशेष भर दिला जाणार आहे. महिला आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांना प्राथमिक भागधारक म्हणून प्राधान्य दिले जाईल, तसेच स्थानिक संस्थांचे सक्षमीकरण करण्यावर ही विशेष लक्ष दिले जाणार आहे.
▪️या बाबत मत व्यक्त करताना श्री. कीर्ती किरण पुजार, जिल्हापरिषद रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले ,“रत्नागिरीमध्ये, आम्ही आमच्या समुदायांची प्रगती आणि विकास सुनिश्चित करून संपूर्ण जिल्ह्यात विविध विकासात्मक आणि शाश्वत उपक्रम यशस्वीपणे राबवत आहोत. रेनट्री फाउंडेशन सोबतची ही भागीदारी आमच्या चालू असलेल्या प्रयत्नांना अधिक कौशल्य आणि अचूक दृष्टी कोन देईल, ज्यामुळे आम्हाला आमचा प्रभाव आणखी वाढवण्यास मदत होईल. सोबतच या सामंजस्य करारामुळे नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करताना समाजातील विकासाला चालना दिल्याने आपण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक वेगाने कार्य करू शकतो. या एकत्रित प्रयत्नांमधून आम्ही शाश्वत परिसंस्थेला चालना देऊन आणि समुदायांना सक्षम बनवून, रत्नागिरीला केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतात एक आदर्श जिल्हा बनवण्याच्या उद्दिष्टा साठी वचनबद्ध आहोत,यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करत आहोत.”
▪️या वेळी रेनट्री फाउंडेशनच्या संस्थापक सौ. लीना दांडेकर म्हणाल्या, “रेनट्री फाउंडेशन मध्ये आमचे उद्दिष्ट नेहमीच शाश्वत, सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून सक्षम समाज आणि शाश्वत परिसंस्था निर्माण करणे हे आहे. पुण्यातील वेल्हे येथे रेनट्री फाऊंडेशनने दिलेल्या योगदानामुळे स्थानिक समुदायांना सहभागी करून घेतल्याने होणारे सकारात्मक बदल दिसून आले आहेत. जिल्हा परिषद रत्नागिरी सोबत भागीदारी केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि आम्हाला विश्वास आहेकी , एकत्रितपणे आम्ही वेल्हे मध्ये मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती मोठ्या प्रमाणाव ररत्नागिरीत करू शकतो, ही भागीदारी आमच्या शास्त्री नदी खोऱ्यावर केंद्रित असलेल्या दीर्घकालीन प्रकल्पाचा एक भाग आहे.”
▪️त्यांनी पुढे सांगितले, “आम्हाला विश्वास आहे की ही भागीदारी जिल्ह्यातील शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. जैवविविधतेचे संरक्षण करणे, जलस्रोतांचे सक्षमीकरण करणे, आणि ग्रामीण जीवनमान सुधारणे तसेच सर्वसमावेशकता आणि समुदाय कल्याणाला प्रोत्साहन देणे हे आमचे ध्येयआहे . आम्ही रत्नागिरीला एक समृद्ध आणि विकासात्मक परिसंस्था बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत, जिथे समुदाय आणि निसर्ग एकोप्या ने एकत्र राहू शकतील आणि एक प्रेरणादायक उदाहरण निर्माण करतील.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment