*विविध समस्यांनी मिऱ्यावासीय ग्रस्त; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*विविध समस्यांनी मिऱ्यावासीय ग्रस्त; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण*
मिऱ्या गावात विकास कामे करताना अत्यंत दर्जाहीन पध्दतीची केली जात असल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप असू कामांबाबत ग्रामपंचायतीलाही विचारात घेतले जात नाही. ग्रामस्थांच्या जागा-जमिनींमधून न विचारताच ही कामे सुरु असल्यामुळे आणि संबंधित यंत्रणा व प्रशासन लक्ष देत नसल्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मिऱ्या गावचे सरपंच, उपसरपंचांसह सदस्य आणि ग्रामस्थांनी विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
पंधरा ऑगस्ट पूर्वीच विविध कामांविषयी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. परंतु कोणत्याही कामामध्ये सुधारणा झाली नाही. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जलजीवन मिशन अंतर्गत जाकीमिऱ्या व भाटीमिऱ्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीचे काम सुरु आहे. महावितरणसाठी भूमिगत केबल टाकणे व स्ट्रीटलाईटचे काम सुरु आहे. मिऱ्या नागपूर हायवेचे काम दर्जाहीन पध्दतीचे झाले आहे. पावसाळ्यामध्ये महावितरणच्या भूमिगत केबलमुळे स्ट्रीटलाईटच्या खांबांना शॉक लागून दोन जनावरे दगावल्याची घटना घडली होती. या समस्येसह भारती शिपयार्डच्या जागी सुरु असलेल्या योमेन कंपनीकडून स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांचे पत्र देण्यात आले होते.
जिल्हा प्रशासनाकडून महावितरण, जिल्हा परिषदेसह संबंधित विभागांना याची माहिती देण्यात आली होती. परंतु, त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये पुन्हा आठवण म्हणून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. परंतु त्यानंतरही या कामांमध्ये सुधारणा झाली नाही. अखेर ग्रामपंचायतीच्यावतीने बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.
सोमवारपासून मिऱ्याच्या सरपंच सरपंच आकांक्षा कीर, उपसरपंच उषा कांबळे, सदस्य आदिती भाटकर, स्मिता शिरधनकर, मानसी शिरधनकर, आर्या सावंत, रामदास बनप, आदेश भाटकर, गुरुप्रसाद माने, विजेंद्र कीर यांच्या ग्रामस्थ व माजी सरपंच बावा नार्वेकर, संदीप शिरधनकर, भैय्या भाटकर यांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment