*बेळगावात कर्नाटकी पोलिसांची दडपशाही; महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते-कार्यकर्त्यांना अटक, मराठी भाषकांत तीव्र संताप!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*बेळगावात कर्नाटकी पोलिसांची दडपशाही; महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते-कार्यकर्त्यांना अटक, मराठी भाषकांत तीव्र संताप!*
कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला महामेळावा यशस्वी होऊ नये, यासाठी मोठी दडपशाही झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.*
*बेळगाव :---* प्रचंड पोलिस बंदोबस्त आणि जमावबंदीचा आदेश लागू असतानादेखील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी चौक येथे येऊन मेळाव्यात सहभागी होण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्नाटकी पोलिसांनी दडपशाही करीत चौकात दाखल झालेल्या समितीच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना अटक करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे बराच वेळ चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच कर्नाटकी पोलिसांच्या झोटिंगशाहीबाबत कार्यकर्त्यांतून तीव्र नाराजी व्यक्त झाली.
कर्नाटक सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे धर्मवीर संभाजी चौक येथे महामेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, महामेळावा होऊ नये, यासाठी कर्नाटकी पोलिसांनी टिळकवाडी, कॅम्प, मार्केट व शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व्हॅक्सिन डेपो, लेले मैदान, धर्मवीर संभाजी चौक, धर्मवीर संभाजी उद्यान व छत्रपती शिवाजी उद्यान परिसरात जमावबंदी करण्याचा आदेश लागू केला होता, तरीही महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते सकाळी दहा वाजल्यापासूनच धर्मवीर संभाजी चौक येथे दाखल होत होते.
मात्र, महामेळावा यशस्वी होऊ नये, यासाठी सकाळी आठ वाजल्यापासूनच चौकात प्रचंड प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच पोलिस उपायुक्त रोहन जगदीश व इतर वरिष्ठ अधिकारी संभाजी चौकातील परिस्थितीवर नजर ठेवून होते. तसेच, मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, शुभम शेळके, प्रकाश शिरोळकर, प्रकाश मरगाळे यांच्या घरासमोर पहाटेपासूनच पोलिसांची नजर होती. तसेच, समितीच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांना कोणत्या प्रकारच्या सूचना केल्या जातात, याची ही माहिती घेतली जात होती.
धर्मवीर संभाजी चौकात कार्यकर्ते आणि पदाधिकारी दाखल झाल्यानंतर अनेकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. परंतु, पोलिसांनी समितीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना दडपशाही करून अटक केली. कार्यकर्त्यांनी कोणत्या कारणास्तव अटक करीत आहात, असा प्रश्न उपस्थित करीत अटक करण्यास विरोध केला.
त्यामुळे काही वेळ पोलिसांनी कार्यकर्त्यात वादावादी झाली. मात्र, चार ते पाच पोलिस एका कार्यकर्त्याला पकडून वाहनात घेऊन जात होते.
त्यामुळे कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला महामेळावा यशस्वी होऊ नये, यासाठी मोठी दडपशाही झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मात्र, कार्यकर्त्यांनीदेखील समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत धर्मवीर संभाजी चौकात उपस्थित राहून पुन्हा एकदा महाराष्ट्रात जाण्याची इच्छा दाखवून दिली आहे.
धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महामेळाव्याला सुरुवात करण्यात येणार होती. मात्र, सर्वच कार्यकर्त्यांना हार अर्पण करण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात कर्नाटकी पोलिसांचा निषेध केला. अनेकजण संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी जात होते.
मात्र, हार काढून घेऊन त्यांना अटक केली जात होती. त्यामुळे परिसरात जमलेल्या कार्यकर्ते आणि नागरिकांतून देखील पोलिसांच्या कृतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त झाली.
*क्षणचित्रे*
कार्यकर्ते येण्याच्या भीतीने सकाळपासूनच मोठा बंदोबस्त
काल सकाळी आठ वाजल्यापासून धर्मवीर संभाजी चौकाला पोलिस छावणीचे स्वरूप
समितीच्या अनेक नेत्यांना घराजवळ अटक
'बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,' अशा घोषणा देत कार्यकर्ते धर्मवीर संभाजी चौक येथे दाखल.
अटक करीत असताना पोलिस आणि कार्यकर्त्यांत वादावादी
अटक झालेल्या कार्यकर्त्यांकडून पोलिसांच्या समोर जोरदार घोषणाबाजी
समितीच्या आंदोलनामुळे धर्मवीर संभाजी चौक आणि परिसरात वाहतूक कोंडी
शहरातील पाच ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त
व्हॅक्सिन डेपोकडे जाणारे रस्ते बॅरिकेड्स लावून बंद
संभाजी उद्यान, शिवाजी उद्यान येथेही पोलिस बंदोबस्त
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment