पाचेरी सडा (मोंभार) येथे संपन्न झालेल्या हिवाळी केंद्रस्तरीय, बिटस्तरीय क्रिडा स्पर्धंत संत निरंकारी मंडळ पाचेरी सडा (मोंभार) या मंडळा तर्फे शैक्षणिक साहित्य, खाऊ व थंड पेय वाटप
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा (मोंभार) या गावात केंद्रस्तरीय, बिटस्तरीय हिवाळी क्रिडा स्पर्धा नुकत्याच उत्साहात संपन्न झाल्या या संपन्न झालेल्या केंद्रस्तरीय हिवाळी क्रिडा स्पर्धंत संत निरंकारी मंडळ पाचेरी सडा (मोंभार) या मंडळा मधील महापुरुषां तर्फे जवळपास ३५० विद्यार्थी व ५० शिक्षक आणि मान्यवर यांना शैक्षणिक साहित्य,खाऊ व थंड पेय वाटप करण्यात आले. यावेळी यावेळी विद्यार्थ्यांना मासिक पत्रिका किंवा हसती दुनिया, एक पेन व चॉकलेट देण्यात आले तसेच शिक्षकांसाठी देवाची ओळख पुस्तक व मंडळाची डायरी, पेन व चॉकलेट देण्यात आले आणि सर्वांसाठी थंड पेय वाटप करण्यात आले. शिक्षक वृंद समितीने संत निरंकारी मंडळाचे आभार मानले.
Comments
Post a Comment