*विद्युत व्यवस्थेतील तांत्रिक बिघाडामुळे एक आठवड्याहुन अधिक काळ पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सुविधा ठप्प*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*


*विद्युत व्यवस्थेतील तांत्रिक बिघाडामुळे  एक आठवड्याहुन अधिक काळ पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सुविधा ठप्प* 

राजापूर -

      गेल्या आठवड्याहून अधिक काळ राजापूर शहरातील पोस्ट ऑफिस मधील रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र विद्युत व्यवस्थेतील तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने तालुकावासियांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली असून जोरदार संताप व्यक्त केला जात आहे.
अथक प्रयत्नानंतर वर्षभरापूर्वी  येथील पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र सुरू करण्यात आले होते. काही वर्षांपूर्वीच  रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यातील पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली होती. तथापी, सातत्याने मागणी होऊन देखील राजापूर शहरातील  पोस्ट कार्यालयात रेल्वेचे आरक्षण सुविधा सेवा केंद्र सुरू झाले नव्हते. त्याबाबतची सातत्याने मागणी सुरू होती. रेल्वेच्या आजी, आजी  मंत्र्यांसह, कोकण  रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडे  अनेक निवेदनाद्वारे सातत्याने पाठपुरावा सुरू होता.  मात्र संबंधित कोकण रेल्वे प्रशासन विभाग त्याकडे लक्ष देत नव्हता. अखेर त्या प्रयत्नांना यश आले आणि वर्षभरापूर्वी राजापूर शहरातील पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. सदर पोस्ट कार्यालयात एक स्वतंत्र  व्यवस्था रेल्वे आरक्षण सुविधा केंद्रासाठी तयार करण्यात आली.
गेल्या वर्षभरामध्ये तालुक्यातील असंख्य रेल्वे प्रवाशांनी या आरक्षण सुविधा केंद्राचा चांगला लाभ घेतला असून त्याला प्रतिसाद देखील चांगला मिळत होता. मात्र गेल्या आठवडाभराहून अधिक काळ हे आरक्षण केंद्र तांत्रिक कारणास्तव बंद असून त्याबाबत अधिक माहिती घेतली असता तेथे उपलब्ध असलेल्या मशीनमध्ये विद्युत पुरवठा होत नसल्यामुळे रेल्वे प्रवाशांना तिकीट उपलब्ध करून देणे अशक्य बनले आहे. गेल्या आठवडाभरात  हे आरक्षण सेवा केंद्र बंद असल्याने तालुका वासियांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली असून ते पुन्हा केव्हा सुरू होईल त्याचीही निश्चिती नसल्याने तालुका वासियांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
   कोकण रेल्वे मार्गावर विस्ताराने मोठ्या असलेल्या राजापूर तालुक्यासाठी राजापूर रोड हे एकमेव रेल्वे स्थानक असून राजापूर शहरापासून ते सुमारे 18 ते 20 किलोमीटरवर असल्याने तालुका वासियाना त्या स्टेशनवर जाऊन आरक्षण करणे खर्चिक ठरत होते. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य पोस्ट कार्यालयाप्रमाणे  राजापूर पोस्ट कार्यालयात देखील रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र सुरू केले जावे अशी जोरदार मागणी मागील काही वर्षे सुरू होती. अनेक वर्षाच्या पाठपुराव्यानंतर  अखेर ती मागणी पूर्णत्वास गेली. आणि राजापूर पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र सुरू झाले होते. मात्र गेला आठवडाभर काही तांत्रिक बिघाडामुळे हे सुविधा केंद्र बंद असून त्यामुळे तालुका वासियांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. आता हे बंद असलेले रेल्वे सुविधा आरक्षण केंद्र नेमके केव्हा पूर्ववत सुरू होईल सांगणे अवघड बनले आहे.  संबंधित रेल्वे विभागाने याची तात्काळ दखल घेऊन रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र मधील निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दूर करावा आणि बंद पडलेली सेवा पूर्ववत सुरू करावी अशी जोरदार मागणी तालुका वासियांमधून करण्यात आली आहे.

......................................


* वैशिष्ट्ये*

* तालुका वासियांना रेल्वेचे आरक्षण करणे सुलभ आणि सोयीस्कर ठरते*

* देशभरातील कुठल्याही गाडीचे आरक्षण करण्याची सुविधा या केंद्रातून उपलब्ध..*

......................................

  *राजापूर शहरातील पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र सुरू झाले खरे मात्र त्याबाबतचा कोणताच फलक संबंधित पोस्ट कार्यालयाबाहेर नसल्याने आरक्षणासाठी येणाऱ्या प्रवाशांना नाहक इकडेतिकडे फिरावे लागत आहे. समस्त प्रवाशांना समजेल असा रेल्वे आरक्षण सुविधा केंद्राचा फलक पोस्ट कार्यालया बाहेर लावण्यात यावा.
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments