वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू : पाच वर्षात केवळ २३ टक्के काम पूर्ण, प्रकल्प पूर्णत्वासाठी मे २०२८ उजाडणार!
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू : पाच वर्षात केवळ २३ टक्के काम पूर्ण, प्रकल्प पूर्णत्वासाठी मे २०२८ उजाडणार!
मुंबई ---वांद्रे-वरळी सागरी सेतूचा विस्तार वर्सोव्यापर्यंत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या कामास २०१९ मध्ये सुरुवात झाली असून पाच वर्षात या प्रकल्पाचे केवळ २३ टक्के काम पूर्ण झाले आहे.
आव्हानात्मक काम आणि २०२० ते २०२२ दरम्यान काही कारणाने काम पूर्णत बंद असल्याने त्याचा फटका या प्रकल्पाला बसला आहे. त्यामुळेच हा प्रकल्प २०२५ ऐवजी आता मे २०२८ मध्ये पूर्ण होणार आहे.*
मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी दूर करून प्रवास अतिवेगवान करण्यासाठी सागरी सेतू प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
या प्रकल्पाअंतर्गत एमएसआरडीसीकडून वांद्रे ते वरळी सागरी सेतू बांधण्यात आला असून हा सेतू गेल्या काही वर्षांपासून वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. या वांद्रे-वरळी सागरी सेतूचा वांद्रे ते वर्सोवा असा विस्तार करण्याचा निर्णय घेत एमएसआरडीसीने वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतू बांधण्याच्या कामास सुरुवात केली.
२०१९मध्ये या १७.१७ किमीच्या सागरी सेतूच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र २०१९ ते २०२२ मध्ये या प्रकल्पाचे काम केवळ अडीच टक्के झाले.
टाळेबंदी आणि कंत्राटदाराच्या भागीदारीमध्ये आलेल्या अडचणींमुळे २०२० ते २०२२ दरम्यान या प्रकल्पाचे काम पूर्णत ठप्प होते. याप्रकरणी कंत्राटदारावर कठोर दंडात्मक कारवाईही करण्यात आली होती.
शेवटी मुख्य कंत्राटदाराने या सर्व अडचणी दूर करत २०२२ पासून कामाला सुरुवात केली.
दरम्यान प्रकल्पाच्या आराखड्यात काही बदलही एमएसआरडीसीला करावा लागला. जुहू कनेक्टरला मच्छिमारांचा विरोध असल्याने हा बदल करावा लागला. २०२२ पासून खर्या अर्थाने या सागरी सेतूच्या कामाला सुरुवात झाली.
तर आता कामाने वेग घेतला असून आतापर्यंत या सागरी सेतूचे २३ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आतापर्यंत २३ टक्के काम पूर्ण झाले असले तरी सुरुवातीला अनेक अडचणी आल्याने काम ठप्प होते. पण आता मात्र काम वेगात सुरु आहे.
तसेच समुद्रात काम करणे अत्यंत आव्हानात्मक असून अनेक प्रकारच्या परवानग्या सातत्याने घ्याव्या लागत आहेत. परिणामी कामास काहीसा वेळ लागत असल्याचेही अधिकार्यांनी स्पष्ट केले.
तर हे काम मे २०२८ मध्ये पूर्ण करत वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतू वाहतूक सेवेत दाखल करण्यात येईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. हा सागरी सेतू वाहतूक सेवेत दाखल झाल्यास वाहनचालक-प्रवाशांना सागरी मार्गाद्वारे आणि सागरी सेतूद्वारे नरिमन पाॅईंट ते वर्सोवा असा थेट प्रवास करता येणार आहे.
मात्र त्यासाठी मुंबईकरांना मे २०२८ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment