"पोलीस व्यवस्थेने बळी घेतला", सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यूनंतर जितेंद्र आव्हाडांचे गंभीर आरोप!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*


"पोलीस व्यवस्थेने बळी घेतला", सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यूनंतर जितेंद्र आव्हाडांचे गंभीर आरोप!*

परभणी येथे १० डिसेंबर रोजी हिंसाचार झाला होता. त्यानंतर या प्रकरणी परभणी पोलिसांनी अटक केलेल्या ३५ वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा रविवारी परभणी जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. 

  परभणी रेल्वे स्थानकाबाहेर भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची कथित विटंबना केल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर परभणी पोलिसांनी अटक केलेल्या ५० जणांपैकी मृत सोमनाथ सूर्यवंशी एक होता. दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या कोठडीतील मृत्यूनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस व्यवस्थेने बळी घेतल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.*

*काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?*

सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट लिहली आहे. त्यामध्ये आमदार आव्हाड म्हणाले की, 'परभणी येथील आंबेडकरी आंदोलक असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस व्यवस्थेने बळी घेतला. 

 कायद्याचे शिक्षण घेणारा हा तरुण 'न्यायालयीन कोठडीत' असताना मरण पावतो, ही अजूनच गंभीर बाब आहे. तो मेला का त्याला मारण्यात आले, हे पोस्टमार्टम झाल्यावर समजेल…पण एक समाज म्हणून आपल्या समोर तोच प्रश्न पुन्हा पुन्हा उभा राहतो…असे अजून किती सोमनाथ आपला जीव गमावणार आहेत..?'

परभणी येथील आंबेडकरी आंदोलक असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस व्यवस्थेने बळी घेतलाय.

  लॉ चा विद्यार्थी असणारा हा तरुण "न्यायालयीन कोठडीत" असताना मरण पावतो,ही अजूनच गंभीर बाब आहे.
तो मेला का त्याला मारण्यात आले,हे पोस्टमार्टम झाल्यावर समजून येईलच...पण एक समाज म्हणून आपल्या… pic.twitter.com/ZQ4CTQ4Qkb

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 15, 2024

*सोमनाथ सूर्यवंशीबरोबर काय घडलं?*

१० डिसेंबर रोजी सोपान पवार या व्यक्तीने संविधानाच्या प्रतिकृतीची कथितपणे विटंबना केली होती, त्यानंतर दुसऱ्या दिवशी निदर्शने आणि दगडफेक झाली. 

  परभणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून सोमनाथ सूर्यवंशी याच्यासह ५० जणांना अटक केली होती. सूर्यवशीला १२ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आणि १४ डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. 

  त्यानंतर छातीत दुखू लागल्याने त्याला स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले.

*पोलिसांवर आरोप*

स्थानिकांनी असा आरोप केला की, पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात काम करणाऱ्या वचला मानवते नावाच्या महिलेला मारहाण केली.

  ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. असे असले तरी पोलिसांनी हे आरोप नाकारले आहेत. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

हिंसाचारानंतर लगेचच दलित वस्त्यांमध्ये पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केल्याचा आरोपही करण्यात येत आहेत. 

  एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कायद्यानुसार आरोपांची चौकशी केली जाईल आणि कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल.

*प्रकाश आंबेडकरांकडून संताप*

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही या प्रकरणी एक्सवर पोस्ट केली आहे. 

 आपोल्या पोस्टमध्ये आंबेडकर म्हणाले की, "परभणीत सोमनाथ सुर्यवंशी या भीमसैनिकाचा कोठडीत मृत्यू झाला आहे. त्याचा जामीन अर्ज मंजूर होऊनही न्यायालयीन कोठडीतच त्याचा मृत्यू झाला यापेक्षा असह्य काय असू शकते."
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments