पप्पूशेठ चव्हाण यांची समाज बांधीलकी..! पप्पूशेठ चव्हाण यांचे आज अभीष्टचिंतन

आबलोली (प्रतिनीधी):
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते पप्पूशेठ चव्हाण यांनी आपल्या जिवन प्रवासातील गेली ४६ वर्ष जनतेची सेवा करण्यात धन्यता मानली आहे. पप्पूशेठ चव्हाण यांनी राजकारणा पेक्षा समाज कारणाला प्राधान्य दिले असून अडी अडचणीत असलेल्या कुठच्याही जाती धर्माच्या व्यक्तीला त्यांनी तन,मन, धन आणि शक्य होईल तेवढी मदत केली आहे. या पुढे हि ते मदत करीत रहाणार आहेत. पप्पूशेठ चव्हाण यांनी समाज सेवेच्या परंपरेचा वसा त्यांच्या वडिलांकडून व आईकडून घेतला आहे. तसेच त्यांच्या आई सुजाता चव्हाण ह्या देखील पंचायत समिती गुहागर येथे उपसभापती होत्या. त्यादेखिल सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत होत्या. आज त्यांचे वडील अशोक चव्हाण (भाई) हयात नसले तरी सामाजिक जिवनात वावरताना पप्पूशेठ चव्हाण हे आपल्या वडिलांची उणीव भासू देत नाहीत. वडिलांच्या पश्चात आई, पत्नी एक मुलगा दोन मुली, तीन बहिणी त्यांना समाज सेवेसाठी प्रेरीत करीत आहेत. पप्पूशेठ चव्हाण यांच्या कडून अशीच समाज सेवा घडत रहावी यासाठी आबलोलीचे माजी सरपंच ॲड . प्रमेय आर्यमाने, पोलिस पाटील महेश भाटकर, पिंटू सुर्वे यांनी पप्पूशेठ चव्हाण यांचे अभिंनदन करुन निरोगी आयुष्य लाभो अशा मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments