मते बंधू यांच्यातर्फे शीर केंद्र शाळेला स्पोर्ट ड्रेसचे वाटप
आबलोली (संदेश कदम)
हिवाळी क्रीडा स्पर्धांचे औचित्य साधून जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा शीर नंबर १ मधील सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना शीर गावचे सुपुत्र व युवा नेतृत्व, शाळा व्यवस्थापन समिती,केंद्रशाळा शीरचे शिक्षण तज्ञ मंगेश बाळकृष्ण मते व त्यांचे मुंबईस्थित बंधू संदेश बाळकृष्ण मते यांच्यातर्फे स्पोर्ट ड्रेसचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक गुरव व उपाध्यक्ष अजय पाटील यांच्या शुभहस्ते या ड्रेसचे वितरण करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक सुहास गायकवाड यांनी यावेळी मंगेश मते यांच्या सामाजिक कार्याचा गौरवाने उल्लेख केला. या शाळेला नेहमीच त्यांचे सहकार्य लाभत असते. तसेच शाळेची गरज ओळखून स्वयंप्रेरणेने एका आठवड्यात सदर ड्रेस उपलब्ध करून दिल्याबद्दल मते बंधू यांना धन्यवाद दिले. यावेळी शाळेतील शिक्षक सौ.प्रमोदिनी गायकवाड, सौ.मृणाली रेडेकर व अजय खेराडे उपस्थित होते.
Comments
Post a Comment