धडाधड सुटलेल्या गोळ्यांच्या आवाजाने हादरला जिल्हा न्यायालयाचा परिसर न्यायाधिशांच्या सुरक्षेतील जवानाचा मृत्यू
न्यायाधीशांच्या सुरक्षा रक्षकाच्या स्वत:चे ताब्यातील स्वयंचलीत हत्यार हाताळत असताना हत्यारातून गोळी झाडली जाऊन 8 पैकी 3 गोळ्या छातीत लागल्याने मृत्यू
न्यायाधीशांच्या सुरक्षा रक्षकाच्या स्वत:चे ताब्यातील स्वयंचलीत हत्यार हाताळत असताना हत्यारातून गोळी झाडली जाऊन 8 पैकी 3 गोळ्या छातीत लागल्याने मृत्यू
गडचिरोली : जिल्हा पोलीस दलात नेमणुकीस असलेले पोहवा /2752 उमाजी होळी, नेमणूक - पोलीस मुख्यालय गडचिरोली, हे आज दि 11/12/2024 रोजी प्रधान जिल्हा न्यायाधीश गडचिरोली यांचे एस्कॉर्ट ड्युटीकरीता कर्तव्यावर हजर होते. दुपारी 02:55 वा चे सुमारास होळी हे जिल्हा न्यायालय गडचिरोलीचे आवारात गाडीत बसलेले असताना त्यांचे स्वत:चे ताब्यातील स्वयंचलीत हत्यार हाताळत असताना हत्यारातून गोळी झाडली जाऊन 8 पैकी 3 गोळ्या छातीत लागल्याने ते जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल केले असता तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी होळी यांना मृत घोषित केलेले आहे.
प्रथमदर्शनी होळी यांचेकडून अनावधानाने गोळी झाडली गेल्याचे दिसून येते आहे.
पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल व इतर वरीष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळ व रुग्णालयात भेट देऊन घटनेची अधिक माहिती घेतली आहे. मयत होळी यांचे कुटुंबीयांना गडचिरोली पोलीस दलाकडून सर्व सहायता देण्यात येत आहे. उद्या दि. 12/12/2024 रोजी उमाजी होळी यांचा अंत्यविधी त्यांचे स्वगाव मोहटोला, बेळगाव ता. जि. गडचिरोली येथे सर्व सन्मानात करण्यात येणार आहे.
पोलीस स्टेशन गडचिरोली येथे अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे करीत आहेत.
Comments
Post a Comment