श्री.नवोदित तरुण विकास मंडळ मुंबई, साखरी खुर्द भोगळेवाडी, तालुका गुहागर या मंडळाचा २९ डिसेंबर रोजी कौटुंबिक मेळावा.
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील श्री. नवोदित तरुण विकास मंडळ मुंबई ग्रामस्थ व महिला मंडळ सागरी खुर्द भोगळेवाडी या मंडळाचा "कौटुंबिक मेळावा - २०२४" रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी वाघे हॉल मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उदघाटन कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका गुहागर मुंबई या संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री. अनंतजी मालप यांचे शुभहस्ते करण्यात येणार असून श्री. नवोदित तरुण विकास मंडळ मुंबई नियोजन कमिटीचे अध्यक्ष श्री. भरत भुवड, अध्यक्ष श्री. दत्ताराम बंगाल, सचिव श्री. नवनाथ भुवड, गुहागर गट अध्यक्ष श्री. सुरेश गिजे, सचिव अनिल भुवड, सह.सचिव श्री.शांताराम आग्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Comments
Post a Comment