उदय सामंत यांच्या खास विमानाने खास जवळची व्यक्ती शपथ सोहळ्यासाठी
रत्नागिरी साठी ही अभिमानाची गोष्ट आहे...की रत्नागिरी चे लोक विमान घेऊन सोहळ्यासाठी जात आहेत.
रत्नागिरी मध्ये डझनभर कार्यकर्ते घेऊन आनंद साजरा केला गेला..
उदय सामंत यांच्या वैयक्तिक मोठेपणा सर्व मान्य करतात.
पण राजकीय महत्वकांक्षी व गुणवत्ता पूर्ण कामे लोकांना अपेक्षित आहेत.
उदय सामंत यांच्या जनतेचा उधळ ललेला पैसा यावेळी शिक्षण, आरोग्य, यासाठी खर्च होऊ दे...असे मानणे प्रविण किणे यांनी केले...
7 कोटीचा गार्डन तोडून मंदिर
60 कोटीचा डांबरी रस्ता तोडून 200 कोटी खर्च
5 कोटीचा गार्डन तोडून परत शिवसृष्टी
करोडो रुपयांच्या मुर्त्या...
एकाबाजूला हे चित्र आहे..
तर दुसऱ्या बाजूला
गरीब मुलांना चांगल्या शाळा नाहीत..
सिव्हील ला जाणे म्हणजे मारणे... मरणे
यापूर्वी राजकीय, आर्थिक इच्छा पूर्ण झाल्या असतील तर आता दोन्ही बांधवांनी जनतेला काय हवे आहे हे एकदा विचारावे..
पैसा , पद , कॉन्ट्रॅक्ट या सोबत आता गरीब जनतेसाठी डी जे सामंत सारख्या शाळा व तुमचे परिवार जिथे शिकले अशा शाळा तयार कराव्यात अशा दैनिक फ्रेश न्यूज चे वतीने शुभेच्छा..
उदय सामंत यांचे अनेक जण आमचे पेपर बद्दल कान भरत असतात पण आमचा उदय सामंत या व्यक्ती ला विरोध नसून त्याच्या चुकीच्या धोरणांना विरोध आहे..आणि तो राहणारच..तरच हे जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे..
मंत्रिपद हे लोकसेवा व जनकल्याण यासाठी वापरतील व कॉन्ट्रॅक्टर ला पाहिजे आहे म्हणून नव्हे तर जनतेला पाहिजे म्हणून काम झाले पाहिजे.
आपण जे रोड चे कंत्राट देता घेता या कामात आपल्या प्रिय आई वडिलांना कोणी खराब कामावरून नावे ठेवू नयेत तर देवरुख रस्त्या प्रमाणे आपले ही नावं व्हावे..हीच सदिच्छा..
मात्र राहुल पंडित, अभिजित गोडबोले, मुन्ना देसाई, यांना पुढील वेळी विमान प्रवास होणार का याची कार्यकर्ते वाट पाहत आहे..
Comments
Post a Comment