देवस्थळी हॉस्पिटल चिपळूण, फ्लाईट एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट शृंगारतळी व ए.एस.जी. पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन

देवस्थळी हॉस्पिटल चिपळूण, फ्लाईट एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट शृंगारतळी व ए.एस.जी. पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक ७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०-२ या वेळेत, ए.एस.जी.पॅरामेडिकल इन्स्टिट्युट, कॅनरा बँकेच्यावर, शृंगारतळी येथे करण्यात आले आहे. 
या शिबिरामध्ये चिपळूणचे देवस्थळी हॉस्पिटलचे अस्थिरोग व सांधेरोपण तज्ञ डॉ. कौस्तुभ देवस्थळी आणि बालरोग तज्ञ डॉ. संजिता देवस्थळी रुग्ण तपासणीसाठी उपलब्ध असणार आहेत.  
अस्थिरोग आणि सांधेदुखीच्या समस्या असलेल्या रुग्णांसाठी डॉ. कौस्तुभ देवस्थळी तपासणी करणार असून, गुडघे दुखणे, सांध्यातून आवाज येणे, हाडांमधील कॅल्शिअमची कमतरता, सांध्यावर सूज, सांधेदुखी,कंबरदुखी ,मानदुखी, पाठदुखी, सायटीका,संधीवात इ. आजारांनी त्रस्त असणाऱ्या रूग्णांना तपासून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.  
डॉ. संजिता देवस्थळी या नवजात बाळांपासून 18 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी शिबिरात उपलब्ध असतील. सर्दी, ताप, ॲलर्जी, पोटदुखी, बालदमा, न्युमोनिया, झटक्याचे आजार, कमी वजनाचे बाळ, हृदयरोग अशा आजारांवर तपासणी केली जाणार आहे. 
आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी मो. 9657898382 /8112122323 वर संपर्क साधण्यात यावा.

Comments