*‘वक्फ बोर्डाने जमिनी परत देऊन राष्ट्रीयत्व दाखवावं’; राज ठाकरे यांची पोस्ट व्हायरल*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*‘वक्फ बोर्डाने जमिनी परत देऊन राष्ट्रीयत्व दाखवावं’; राज ठाकरे यांची पोस्ट व्हायरल*

लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील, तळेगाव गावातील 103 शेतकऱ्यांना राज्य वक्फ बोर्डाने नोटीस बजावल्या आहेत. या गावातील मोठ्या प्रमाणात शेत जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे, अशा चर्चा सुरू आहेत. यावरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत वक्फ बोर्डाने राष्ट्रीयत्व दाखवून जमिनीवरचा मालकी हक्क सोडावा, अशी मागणी केली आहे.           

राज ठाकरे यांनी या संदर्भातील पोस्ट एक्स या प्लॅटफॉर्मवर केली आहे. ‘प्रश्न हा या जमिनीपुरता नाही. तर वक्फ बोर्ड गेली कित्येक वर्ष मनमानी कारभाराने लोकांवर जी दहशत बसवतंय त्याला चाप कसा बसवणार हा आहे ? हा आहे. काही महिन्यांपूर्वी संसदेत वक्फ कायद्यात सुधारणा सुचवणारं विधेयक केंद्र सरकारने मांडलं होतं. त्यावर मुस्लिमधार्जिण्या विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला आणि त्यामुळे हे विधेयक संसदीय समितीकडे पुनर्विचारासाठी पाठवलं गेलं. या सुधारित विधेयकावर महाविकास आघाडीतील पक्षांची भूमिका ही विरोधाची होती, हे वेगळं सांगायला नको’, या शब्दात राज ठाकरे यांनी वक्फ बोर्डासह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या भूमिकेवरही टीका केली.

*वक्फ बोर्डाने जमिनी परत द्याव्या*
याच पोस्टमध्ये राज ठाकरे पुढे म्हणतात, ‘मला आज देशातील एकूणच वक्फ बोर्डांना एका गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे, ती म्हणजे स्वातंत्र्यानंतर विनोबा भावेंनी ‘भूदान चळवळ’ सुरु केली. ज्यामध्ये लाखो एकर जमीन देशातील हिंदूंनी, सरकारला परत केली होती. जेणेकरून भूमिहीनांना कसण्यासाठी जमीन मिळेल. हा जसा भूमिहीनांसाठी केलेला त्याग होता तसाच तो देशासाठी केलेला त्याग पण होता. असा त्याग किंवा मनाचा मोठेपणा वक्फ बोर्डानी पण दाखवावा. सतत कुठे, ना कुठे लोकांच्या जमिनीवर ताबा सांगण्यापेक्षा वक्फ बोर्डाने स्वतःच्या ताब्यातील जमिनी सरकारला परत करून स्वतःच राष्ट्रीयत्व दाखवून द्यावं.’

*वक्फ बोर्डाचं स्पष्टीकरण*
वक्फ बोर्डाने दावा केला असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य वक्फ बोर्डानेही यासंदर्भातली माहिती घेतली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काजी यांनी सांगितलं, ‘एका व्यक्तीने वक्फ ट्रिब्यूनलमध्ये दावा दाखल केल्यानंतर कोर्टाने संबंधित शेतकऱ्यांना नोटीस पाठवले आहेत. त्या नोटीस वक्फ बोर्डाने बजावलेल्या नाहीत. त्याचबरोबर आम्ही लातूर मधील कोणत्याही गावावर दावा सांगितलेला नाही.’ असं स्पष्टीकरण समीर काजी यांनी दिलं.
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments