*कुमार महाराष्ट्र केसरी पैलवानाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*कुमार महाराष्ट्र केसरी पैलवानाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू*
पुण्याच्या मुळशी तालुक्यात एका पैलवानाचा जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. विक्रम पारखी असं मृत पैलवानाचे नाव आहे. बुधवारी सकाळी मुळशी तालुक्यातील माण येथे जिममध्ये ही घटना घडली. राष्ट्रीय खेळाडू पैलवान विक्रम पारखी यांचे आकस्मिक निधनाने माणसह मुळशीवर शोककळा पसरली आहे.
विक्रमचे येत्या १२ डिसेंबरला लग्न होणार होतं. घरात लग्नाची धामधून सुरू होती. मात्र त्याआधीच काळाने त्याच्यावर झडप घातली. नियतीच्या मनात काही वेगळच असल्याने संसाराच्या आखाड्यात उतरण्यापूर्वीच तो आयुष्याच्या आखाड्यात चितपट झाला आहे. विक्रमच्या मृत्यूने पारखी लग्नघरावर शोककळा पसरली आहे.
पैलवान विक्रम पारखी हे मुळशी तालुक्यातील माण येथे राहण्यास होते. बुधवारी सकाळी ते माण येथे असणाऱ्या जिममध्ये व्यायामासाठी गेले होते. तेथे व्यायाम करत असताना त्यांना अचानक त्रास होऊ लागला. त्यांना तात्काळ पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
विक्रमने कुमार महाराष्ट्र केसरीसह अनेक राष्ट्रीय पदकं आणि किताब पटकावले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेतही सहभाग घेतला होता. कुमार महाराष्ट्र केसरी, ब्रॉंझ पदक, आदर्श व गुणी खेळाडू असे अनेक किताब त्याने पटकावले आहेत. मुळशीतल्या माणगावचा भूमिपुत्र असलेल्या विक्रम पारखी यांनी कुमार महाराष्ट्र केसरी पदावर आपले नाव कोरले होते.
२८ नोव्हेंबर २०१४ रोजी वारजे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित “महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा २०१४” झाली होती. त्या स्पर्धेत विक्रमने अजिंक्यपद मिळवले होते. विक्रम याने अनेक राष्ट्रीय पदके व किताब मिळवले आहेत. माजी सैनिक शिवाजीराव पारखी यांचे ते चिरंजीव तर युवा नेते बाबासाहेब पारखी यांचे बंधू होते.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment