केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा मोंभार क्रीडानगरी, पाचेरी सडा येथे उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम) 
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील पाचेरी आगर केंद्राच्या केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा गुहागर तालुक्यातील मोंभार क्रीडानगरी, पाचेरी सडा येथे उत्साहात संपन्न झाल्या या भव्य दिव्य स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेषतः त्रिमूर्ती ग्रामविकास मंडळ, मुंबईकर पाणबुडीची लेकरं मंडळी,सर्व पालक, सर्व ग्रामस्थ व शिक्षक वृंद पाचेरी सडा या सर्वांनी गेले आठ दिवस परिश्रम घेऊन मैदान तयारी, जेवण तयारी , तसेच पाण्याची व्यवस्था सर्व कामे चोखपणे बजावून एक आदर्शवत केंद्रस्तर क्रीडा स्पर्धेचे आयोजन कसे असावे याचा आदर्श घालून दिला. याबद्दल पंचक्रोशितील सर्व गावातील ग्रामस्थ यांनी पाचेरी सडा गावातील ग्रामस्थांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आहे.
                        महिला मंडळ , पाचेरी सडा यांनी अतिशय मेहनत घेऊन दोन दिवस साधरण १४०० ते १५०० खेळाडू, शिक्षक , ग्रामस्थ तसेच पाहुणे मंडळी यांना चहा , नाष्टा व जेवण दिले याबद्दल सर्व महिला मंडळाचे कौतुक करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देणगी दिलेले सर्व देणगीदार यांच्या मुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला त्याबद्दल त्यांचे शाळा व्यवस्थापन समिती तर्फे आभार व्यक्त केले तसेच त्रिमूर्ती ग्रामविकास मंडळ , पाचेरी सडा यांच्या माध्यमातून भरघोस देणगी देऊन ग्रामस्थांनी एक आदर्शवत स्पर्धा घडवून आणली.या स्पर्धेसाठी उत्तम अशी इंद्रायणी साऊंड सिस्टीम व मंडप डेकोरेशन माजी सरपंच श्री. संतोषजी आंब्रे यांनी उपलब्ध करून दिली.
                       यावेळीशाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय वाघ यांनी त्रिमूर्ती ग्राम विकास मंडळ पाचेरी सडा चे सर्व मुंबईकर मंडळी, पालक वर्ग , महिला मंडळ , ग्रामस्थ पाचेरी सडा यांचे ऋण व्यक्त केले तसेच शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. अनिलभाऊ जोशी यांनी देखील अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माजी सरपंच श्री. संतोषजी आंब्रे साहेब यांनी भूषविले व त्यांच्या अध्यक्षते खाली या क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या .या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेचे उपशिक्षक श्री. सचिन लबडे सर यांनी केले.

Comments