*मासेमारी नौकेची पाणबुडीला धडक, दोन खलाशांचा मृत्यू!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*


*मासेमारी नौकेची पाणबुडीला धडक, दोन खलाशांचा मृत्यू!*

मुंबई :-- पाणबुडीला मासेमारी नौकेने धडक दिल्याची घटना अरबी समुद्रात घडली असून या धडकेत नौकेवरील दोन खलाशांचा मृत्यू झाला. या अपघातात नौसेनाच्या पाणबुडीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मासेमारी नौकेवरील तांडेलविरोधात मुंबईतील यलोगेट पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

  नौकेवरील दोन्ही खलाशांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते जे जे रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, मृतदेहाची ओळख पटविण्यात येत आहे.*

कर्नाटक येथील कारवार बंदरातून भारतीय नौसेनेची आय.एन.एस. करंजा ही पाणबुडी २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास पैरीस्कोप डेप्थ मेंटेन करून गोवा राज्याच्या समुद्र किनाऱ्यावरून दक्षिण पूर्व (१५४ डिग्री) दिशेने ६ सागरी मैल वेगाने जात होती. दरम्यान, पाणबुडीच्या उजव्या बाजूस एक मासेमारी बोट दोन ते तीन किमी अंतरावर होती.

भारतीय नौसेनेचे कार्यकारी अधिकारी कमल प्रीत सिंह यांनी केलेल्या तक्रारीनुसार, पाणबुडीवरील यंत्रणेवर एफ. व्ही मारयोमा मासेमारी नौका दिसत होती. 

  त्यावेळी एफ. व्ही. मारथोमा मासेमारी नौकेने अचानक वेग वाढवला आणि ती आमच्या पाणबुडीजवळ येऊ लागली. त्यावेळी ऑफीसर ऑफ द वॉच यांनी नौकेपासून सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी पाणबुडीचा वेग वाढवून दिशा बदलली. परंतु एफ. व्ही. मारथोमा नौका वेगात येऊन पाणबुडीवर धडकली. पाणबुडीवरील अधिकाऱ्यांनी बुडालेल्या बोटीवरील खलाशांच्या बचावासाठी बचाव मोहीम हाती घेतली. 

  त्यानंतर काही वेळाने भारतीय नौदलाचे एक जहाज बचाव कार्यासाठी धावून आले. बुडालेल्या एफ. व्ही. मारथोमा बोटीवरील हरवलेल्या दोन खलाशांचे मृतदेह शोध मोहिमेदरम्यान सापडले असून हे मृतदेह यलो गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. 

  नौसेनेच्या पाणबुडीचे सुमारे १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे नौसेनेचे कार्यकारी अधिकारी कमल प्रीत सिंह यांनी तक्रारीत म्हटले आहे.
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या

news.mangocity.org