*बजाज फायनान्समधून बोलतोय सांगत केली लाखांची फसवणूक*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*बजाज फायनान्समधून बोलतोय सांगत केली लाखांची फसवणूक*


बजाज फायनान्स या नामांकित कंपनीच्या नावाने नागरीकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.  लोनचे आमिष दाखवून  फसवणूक करीत होते. या गुन्ह्यातील म्होरक्या समीर राणे याच्या शोधात मानपाडा पोलिस आहेत. धक्कादायक म्हणजे बंगालचा फोन नंबर आणि बँक अकाऊंट नंबर वापरून ही फसवणूक केली जात होती.         

डोंबिवली पूर्वेतील आजदे गावात राहणाऱ्या किरण काळे यांना पैशांची गरज होती. त्यांना एका दिवशी त्यांच्या मोबाईलवर फोन आला. फोनवरुन बोलणाऱ्या व्यक्तीने आम्ही बजाज फायनान्स कंपनीतून बोलतो आहे. तुम्हाला लोन पाहिजे असेल तर सांगा. लोनसाठी लागणारे विविध प्रकारचे चार्जेस असल्याचे सांगून त्यांच्याकडून त्यांनी एक लाख रुपये उकळले. 

किरण यांच्या लक्षात आले की, त्यांना लोन दिले गेले नाही. केवळ पैशाची मागणी केली जात आहे. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. त्यावेळी पोलीस तपासामध्ये किरण यांना ज्या नंबरहून फोन आला तो बंगालमधील अकाऊंटचा आहे. तर, अबंरनाथ आणि मलंग रोडवरील एटीएममधून पैसे काढण्यात आले आहेत, असं लक्षात आलं.                  

पोलिसांनी संबंधित बँकेकडून सीसीटीव्ही फूटेज मागवून घेतले. सीसीटीव्हीच्या फूटेजमध्ये पोलिसांना पैसे काढणारे दोन व्यक्ती दिसून आले. या दोन्ही व्यक्तींनी एटीएममधून पैसे काढले होते. त्यापैकी एक व्यक्ती हा कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात राहतो. पोलिसांनी या व्यक्तीच्या दुचाकीचा नंबरही शोधून काढला. त्याचा माग काढत पोलिस चक्कीनाका येथे पाेहचले. संबंधित व्यक्ती दुचाकी घेऊन चक्कीनाका येथे आला असता पोलिसांनी त्याचा पाठलाग करत मुसक्या आवळल्या. 

अमोल राऊत असे त्याचे नाव आहे. त्यानंतर अमोलने दिलेल्या माहितीवरुन टिना चव्हाण नावाच्या महिलेस ही मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अमोल ने फक्त आपला अकाऊंट नंबर समीर राणे आणि टिना चव्हाण यांना वापरण्यासाठी दिला होता. ज्या लोकांची फसवणूक केली जात होती. त्यांच्याकडून येणाऱ्या एकूण रक्कमपैकी 30 टक्के रक्कम अमोल घेत होता. उर्वरीत 70 टक्के रक्कम समीर घेत होता.  अमोल, टिना आणि समीर हे तिघांपैकी समीर आणि टिना हे अनेक वर्षापासून बँकेचे काम पाहत आहेत. त्यांना लोन कसे दिले जाते याची माहिती असल्याने ते त्याचा गैरफायदा घेत लोकांची फसवणूक करीत होते. पोलिस आता समीरच्या शोधात आहेत.

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments