दिल्लीत अरविंद केजरीवालांवर हल्ला! आपचे मंत्री म्हणाले, "अंगावर स्पिरीट फेकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न.."

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

दिल्लीत अरविंद केजरीवालांवर हल्ला! आपचे मंत्री म्हणाले, "अंगावर स्पिरीट फेकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न.."

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला झाल्याची घटना पाहायला मिळाली आहे. पोलीस केजरीवालांना सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरले आहेत.

  दिल्लीतल्या मालवीय नगर परिसरात केजरीवाल यांची पदयात्रा चालू होती. त्याचवेळी एका इसमाने सुरक्षा व्यवस्था भेदून केजरीवालांच्या जवळ जात त्यांच्या अंगावर एका द्रव पदार्थाचा शिडकावला केला. 

  दरम्यान, आम आदमी पार्टीने म्हटलं आहे की 'त्या इसमाने केजरीवाल यांच्या अंगावर स्पिरिट (ज्वलनशील पदार्थ) फेकलं, त्याच्या हातात काडीपेटी देखील होती. अरविंद केजरीवाल यांना जिवंत जाळण्याचा त्या इसमाचा प्रयत्न होता'. आम आदमी पार्टीचे प्रवक्ते व मंत्री सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, केजरीवालांवरील हल्ल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.*

दरम्यान, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या हल्ल्यानंतर सौरभ भरद्वाज यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, 'ग्रेटर कैलास विधानसभा मतदारसंघातील सावित्रीनगर परिसरात अरविंद केजरीवाल यांची पदयात्रा चालू होती. 

  या पदयात्रेला हजारोंच्या संख्येने लोक जमले होते. यामध्ये महिला, वृद्ध, लहान मुलं व तरुणांची मोठी संख्या होती. केजरीवाल यांना पाहण्यासाठी, भेटण्यासाठी गल्लीबोळात लोक जमले होते. त्याचवेळी एका इसमाने केजरीवाल यांच्यावर हल्ला केला. मी स्वतः त्यावेळी केजरीवाल यांच्याबरोबर होतो.

  माझं जॅकेट देखील त्यावेळी भिजलं. त्या इसमाने केजरीवाल यांच्या अंगावर स्पिरिट फेकलं होतं. त्याने आमच्या अंगावर पाण्यासारखा द्रव पदार्थ फेकल्यानंतर मी व केजरीवालांनी वास घेऊन पाहिलं. आम्ही वासावरून ओळखलं की हे स्पिरिट होतं. 

  त्या इसमाने केजरीवाल यांना जिवंत जाळण्याच्या प्रयत्न केला. त्याच्या एका हातात स्पिरिट तर दुसऱ्या हातात काडीपेटी होती.

*आम आदमी पार्टीचे गंभीर आरोप*

सौरभ भारद्वाज म्हणाले, 'त्या इसमाने केजरीवाल यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला असला तरी आमचे कार्यकर्ते देखील खमके आहेत. 

  त्यांनी लगेच त्या हल्लेखोराला पकडलं. तो आमच्या अंगावर स्पिरिट फेकू शकला मात्र काडीपेटी पेटवू शकला नाही. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल भर रस्त्यात जिवंत पेटवण्याचा प्रयत्न झाला. ही खूप गंभीर बाब आहे. 

  केजरीवाल यांनी पदयात्रा सुरू केल्यापासून त्यांना लोकांकडून मिळणारं समर्थन वाढतंय. लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे जी दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची झोप उडाली आहे. 

  त्यांचे नेते सैरभैर झाले आहेत. ते तिसऱ्यांदा दिल्लीत विधानसभा निवडणूक पराभूत होणार आहेत. सध्या त्यांची बिकट परिस्थिती दिसत आहे. त्यामुळेच ते लोक अशा कुरापती करत आहेत. केजरीवालांवर झालेला हा काही पहिला हल्ला नाही. यापूर्वी देखील असे अनेक प्रयत्न झाले आहे.

   मात्र, अशा हल्ल्याने केजरीवाल थांबणार नाहीत. ते आजवर थांबले नाहीत, घाबरले नाहीत. पुढेही थांबणार नाहीत. त्यांचा प्रवास चालूच राहील. ते लोकांची सेवा करत राहतील.

बेशर्म भाजपा ने फिर करवाया केजरीवाल जी पर हमला #शर्म करो शर्म करो #kejriwal ji per acid attack
अमित शाह की नाकामी फिर जग जाहिर हुई है, दिल्ली में कानून का राज़ नहीं भाजपाई गुंडो का राज है। अगर देश की राजधानी में एक पूर्व मुख्यमंत्री सुरक्षित नहीं है तो आम आदमी का क्या होगा 

*केजरीवालांवर सलग तीन हल्ले*

भारद्वाज यांनी सांगितलं की 'यापूर्वी विकासपुरीमध्ये देखील केजरीवाल यांच्यावर अशाच पद्धतीचा हल्ला झाला होता.

   तेव्हा देखील पोलीस केवळ बघ्याच्या भूमिकेत होते, हसत होते. पोलीस त्यावेळी त्या गुंडांसमोर हात जोडत होते. त्यानंतर काल बुराडीमध्ये देखील केजरीवाल यांच्यावर हल्ला झाला. 

  काल त्यांच्यावर तिसरा हल्ला झाला. मात्र पोलीस त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेकडे लक्ष देत नाहीत.
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments