*महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे निधन*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे निधन*
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, माजी परराष्ट्र मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सोमनहल्ली मैल्लया कृष्णा यांचे आज पहाटे (१० डिसेंबर) सकाळी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. एस. एम. कृष्णा गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. मध्यरात्री २.४५ च्या सुमारास त्यांनी त्यांच्या बंगळुरू येथील राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. एस. एम. कृष्णा हे राजकारणातले दिग्गज नेते मानले जात असत. २०१७ मध्ये भाजपात प्रवेश केल्यापासून राजकीयदृष्ट्या ते निष्क्रिय होते. आपल्या साठ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी आमदार, खासदार, मुख्यमंत्री, राज्यपाल या पदांसह अनेक महत्त्वाची सार्वजनिक पदं भुषवली होती.
१९९९ ते २००४ या काळात ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. २००४ ते २००८ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम केले. २००९ साली एस.एम कृष्णा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यरत होते. मार्च २०१७ साली एस.एम कृष्णा यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपात प्रवेश केला. २०२३ साली केंद्र सरकारने एस.एम कृष्णा यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. एस.एम कृष्णा यांनी त्यांचे पदवीचे शिक्षण म्हैसूरच्या महाराजा कॉलेजमधून पूर्ण केले. त्यानंतर बंगळुरू येथे सरकारी कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. उच्च शिक्षणासाठी ते पुढे अमेरिकेत गेले. तिथून परतल्यानंतर ते भारतीय राजकारणात सक्रीय झाले. १९६२ साली ते पहिल्यांदा कर्नाटक विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले. कर्नाटकच्या मांड्या लोकसभा मतदारसंघातून ते अनेकदा विजयी झाले. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम केले. १९८३-८४ मध्ये इंदिरा गांधी आणि १९८४-८५ च्या राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये ते उद्योग आणि अर्थ राज्यमंत्री होते.
१९६२ साली एस.एम कृष्णा हे कर्नाटकच्या मद्दूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला होता. जिंकल्यानंतर त्यांनी प्रजा सोशलिस्ट पार्टीत प्रवेश घेतला. १९६८ साली मांड्या लोकसभा पोटनिवडणुकीत ते विजयी झाले. त्यानंतर कृष्णा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९७१ साली मांड्या लोकसभा मतदारसंघातून ते पुन्हा निवडून आले. १९८५ मध्ये ते पुन्हा राज्याच्या राजकारणात परतले. तिथे १९९९ ते २००४ पर्यंत कर्नाटकात ते मुख्यमंत्री राहिले. डिसेंबर २००४ ते २००८ काळात ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री होते. जानेवारी २०२३ मध्ये एस.एम कृष्णा यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान, एस.एम कृष्णा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एस.एम कृष्णा यांनी त्यांच्या कारकिर्दीत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होते. कर्नाटकात मुख्यमंत्री असताना त्यांनी पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले होते. गेल्या अनेक वर्षात मला एस. एम कृष्णा यांच्याशी संवाद साधण्याची अनेकदा संधी मिळाली. त्या चर्चा कायम स्मरणात राहतील. त्यांच्या जाण्यानं मला खूप दु:ख झालं आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत असं मोदींनी ट्विट करून म्हटलं आहे.
राजकीय क्षेत्रातील सहा दशकाच्या त्यांच्या कामाची पावती म्हणून एस. एम. कृष्णा यांना २०२३ मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आले होते. एस. एम कृष्णा यांच्या पश्चात त्यांची पत्नी प्रेमा, दोन मुली शांभवी आणि मालविका आहेत.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment