चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी जैन तंत्रज्ञान महाविद्यालय खरवते - दहिवली महाविद्यालयाचे आबलोली येथे "निवासी शिबीर
आबलोली (संदेश कदम)
चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय खरवते - दहिवली या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत निवासी शिबीराचे आयोजन दिनांक २३ डिसेंबर २०२४ ते दिनांक २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत गुहागर तालुक्यातील आबलोली येथे आयोजित करण्यात आले असून या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत निवासी शिबिराचे उदघाटन चंद्रकांत बाईत महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली, नवीन शैक्षणिक संकुल ठिकाण खोडदे गोणबरेवाडी येथे शिक्षण महर्षी,माजी सभापती व लोक शिक्षण मंडळ आबलोली या संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकातशेठ बाईत यांचे हस्ते शिक्षण महर्षीमाजी खासदार गोविंदराव निकम साहेब यांच्या प्रतिमेचे पुजन दीपप्रज्वलन करुन व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांच्या हस्ते श्रिफळ वाढवून ग्रामविकास अधिकारी बाबूराव सुर्यवंशी, कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश घाणेकर, रजत बाईत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे स्वयंसेवक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment