*गरज सरो वैद्य मरो, हीच भाजपची भूमिका; सत्तेसाठी देवेंद्र फडणवीसांचा फोन मात्र..., बच्चू कडूंचा 'प्रहार'!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*गरज सरो वैद्य मरो, हीच भाजपची भूमिका; सत्तेसाठी देवेंद्र फडणवीसांचा फोन मात्र..., बच्चू कडूंचा 'प्रहार'!*

अमरावती : ---देवेंद्र फडणवीस यांनी मला सत्तेसाठी फोन केला होता. मात्र माझ्या मतदारसंघासाठी काही मदत हवी आहे का? काही निधी हवा आहे का? यासाठी कधीही त्यांनी फोन केला नाही. किंबहुना मित्रता टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एकदाही मला फोन केला नाही. त्यामुळे गरज सरो आणि वैद मरो! ही भाजपची नेहमीची भूमिका असल्याची टीका करत बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.*

जाती-धर्माकडे एकंदरीत निवडणूक नेण्याचा परिणाम झाला. त्यामुळे माझा पराभव हा तांत्रिक पराभव आहे. ईव्हीएम मशीनचा ही त्यात सहभाग आहे. माझी ही गफलत झाली. मात्र मी पराभूत झालो असलो तरी माझा वेग आता वाढेल. मला पराभूत झाल्यावर ही आनंद आहे कारण मी दिव्यांगांसाठी काम करतोय. 

  अशी प्रतिक्रिया देत बच्चू कडू यांनी ही आपल्या पराभवाचे कारण सांगत ईव्हीएम मशीनला जबाबदार ठरवले आहे.

*भाजप म्हणजे 'गरज सरो वैद्य मरो'*

राज्यात दिव्यांगांचे लवकरच मोठे आंदोलन उभारणार आहोत. त्यात दिव्यांग, शेतमजूर व शेतकऱ्यांसाठी सतत कार्यरत राहण्याचा विश्वास आहे. माझ्या मतदारसंघात पैसा आणि जात माझ्या विजयाच्या वाटेत आली. विरोधकांनी बच्चू कडूला टार्गेट करून अभियान राबवविलं. तसेच भारतीय जनता पार्टी म्हणजे "गरज सरो वैद्य मरो" मलाही याचा अनुभव आलेला आहे. त्यांच्या मदतीसाठी फडणवीस यांचा फोन येतो, मात्र त्यानंतर ते बच्चू कडूंना विसरले.

*मोहन भागवत यांनी स्वतः पासून सुरुवात करायला पाहिजे*

दरम्यान, घटत्या लोकसंख्या वाढीच्या दरावरुन सरसंघचालकांनी मोहन भागवतांनी चिंता व्यक्त केली आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत असं भागवतांनी म्हटलं आहे. लोकसंख्या शास्त्राच्या आकड्यांचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांनी यावर भाष्य केलं आहे. दरम्यान यावरून बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत संघ प्रमुख मोहन भागवत यांनी स्वतः पासून सुरुवात करायला पाहिजे, असा सल्ला दिला आहे. 

 भाजपच्या आमदार खासदारांनी आधी हे केलं पाहिजे. एकीकडे तीन अपत्य असेल तर निवडणूक लढवता येत नाही. महत्त्वाचं राष्ट्रहित आहे. राष्ट्र आहे तर धर्म आहे. असेही बच्चू कडू म्हणाले.

*सत्तेतला दांडुक म्हणजे हे मंत्रालय- बच्चू कडू*

राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तास्थापनेबाबतही बच्चू कडू यांनी भाष्य केलंय. गृह मंत्रालय या साठी महत्त्वाचं आहे की कुणाला ठेचायच, कुणाच्या नांग्या नडवायच्या ते या गृह मंत्रालयकडून केल्या जातात. 

  सत्तेतला दांडुक म्हणजे हे मंत्रालय. गावात कितीही खून होऊ द्या, त्याच्याशी पार्टीला काही घेणे देणे नसतं. असंख्य खूनातून पार्टी कशी निर्माण करता येईल, हा भाव त्या गृह मंत्रालयाच्या माध्यमातून असतो. असेही बच्चू कडू म्हणाले.

*एकनाथ शिंदे माझे मित्र, मात्र...*

लाडकी बहीण योजना आणून वेळेवर तिजोरी खाली केली आणि नंतर फोन केल्या गेले की तुमच्या खात्यात सात हजार रुपये आले, हे काय? त्यामुळे जिसकी सत्त्ता उसकी भैंस. असेही बच्चू कडू म्हणाले.

   तर मुख्यमंत्री कुणीही होवो, जो जनतेची काम करेल तो आवडेल. असेही ते म्हणाले. माध्यमांनी खोटी माहिती जाहीर केली की मी शिंदेंना भेटलो. मात्र माझी आणि एकनाथ शिंदे यांची भेट झालेली नाही. ते माझे मित्र जरूर आहेत. 

  मात्र आमची भेट झालेली नाही.

 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments