*कातकरी वीट भट्टी प्रकल्पाचे पत्रकार संतोष कुळे यांच्या हस्ते उद्घाटन*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*कातकरी वीट भट्टी प्रकल्पाचे पत्रकार संतोष कुळे यांच्या हस्ते उद्घाटन*
*चिपळूण ता.आदिवासी आदिम सेवा व रोजगार सहकारी संस्थेचा उपक्रम*
*संस्था करणार वीट भट्टीतून रोजगार निर्मिती*
▪️तालुका आदिवासी आदिम सेवा व रोजगार सहकारी संस्थेच्या नव्याने सुरू होणाऱ्या चिंचघरी येथील वीट भट्टी प्रकल्पाचे उद्घाटन कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा ग्रामीण चिपळूणचे अध्यक्ष पत्रकार संतोष (भाई) कुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन मोहिते सह अनेक मान्यवर आणि आदिवासी कातकरी समाजातील बांधव उपस्थित होते.
▪️आदिवासी कातकरी समाज विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी आदिवासी आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्याचे रत्नागिरी जिल्हा सचिव चंद्रकांत जाधव आणि इतर सहकारी नेहमी प्रयत्नशील आहेत. आपला समाज पुढे जावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यातूनच चंद्रकांत जाधव यांनी समाजातील युवकांची चर्चा करून रोजगार निर्मितीसाठी काहीतरी साधन असावे यासाठी चिपळूण तालुका आदिवासी आदिम सेवा व रोजगार सहकारी संस्थेची स्थापना केली. स्थापना केल्यानंतर या संस्थेचे कामकाज सुरू झाले. या संस्थेने आपल्या समाजातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी विट प्रकल्प सुरू करण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवले आणि ते प्रत्यक्षात आता पूर्ण होत आहे. याच वीटभट्टी प्रकल्पाचे उद्घाटन सोमवार दिनांक १६ डिसेंबर रोजी १२ बारा वाजता तालुक्यातील चिंचघरी येथे असलेल्या जागेत पत्रकार संतोष कुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव आणि सचिव सुरेश मोहिते यांनी या प्रकल्पासंदर्भातील उपस्थित त्यांना माहिती दिली.
▪️संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी सांगितले की हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किंवा या प्रकल्पाला अर्थसहाय्य म्हणून शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक यांच्याकडून अर्थसहाय्य प्राप्त झाले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली वीट भट्टी प्रकल्पाची उभारणी होत आहे. समाजातील बांधवांना एकाच ठिकाणी रोजगार मिळावा त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होण्यासाठी हा प्रकल्प आधार ठरणार आहे.
▪️या संस्थेच्या माध्यमातून भविष्यात अनेक छोटे-मोठे उद्योग करण्याचा मानस सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला. या
▪️प्रकल्पाचे उद्घाटन करताना पत्रकार संतोष कुळे यांनी सुद्धा या आदिवासी आदिम सेवा व रोजगार सहकारी संस्थेचे कौतुक केले. कमी कालावधीमध्ये या संस्थेने वीट प्रकल्प सुरू करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते आता प्रत्यक्षात उतरत आहे. वीट भट्टी प्रकल्प सुरू करणे तसे धाडसाचे काम आहे. परंतु या संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि संचालक यांनी यासाठी मेहनत घेत मोठे पाऊल उचलले आहे. निश्चितच हा विट भट्टी प्रकल्प पुढे जाऊन कातकरी समाजाला रोजगार देणारा एक मोठा प्रकल्प होईल असे त्यांनी सांगितले. संस्थेने यासाठी एक डंपर आणि ट्रॅक्टर खरेदी केला आहे . याकरता शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक यांनी आर्थिक सहाय्य करून त्यांच्या कामाला हातभार लावलेला आहे. स्थलांतरित जीवन जगण्याची पद्धत यामुळे थोडीफार कमी होऊ शकते. एकाच ठिकाणी कातकरी बांधवांना रोजगार उपलब्ध झाला तर निश्चितच त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यात मदत होईल असे त्यांनी बोलताना सांगितले.
▪️या कार्यक्रमाला चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन मोहिते, भीम सैनिक युवा प्रतिष्ठान चिपळूणचे अध्यक्ष शुभम कदम, पदाधिकारी प्रफुल्ल मोहिते, अजय पवार, संकेत मोहिते, आकाश कांबळे, पत्रकार गौरव तांबे, संस्थेचे संचालक सिद्धार्थ पवार,
मंगेश हिलम, मंगेश हिलम, महेंद्र निकम कुटरे,
राजु पवार, श्रीकांत पवार, संतोष हिलम, रोहित पवार,
संदिप पवार, सौ. रेश्मा जाधव, सुरेखा पवार, आणि कामगार उपस्थित होते.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment