*अजितदादांचा असाही विक्रम; सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार एकमेव नेते ठरणार*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*अजितदादांचा असाही विक्रम; सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार एकमेव नेते ठरणार*


▪️मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार हे गुरुवारी (5 डिसेंबर) सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज्याच्या राजकारणात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे अजित पवार एकमेव नेते ठरणार आहेत.

▪️अजित पवार 1991 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत ते सातत्याने निवडून येत आहेत. त्यांनी राज्य सरकारमधील अनेक विभागांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. पण जलसंपदा मंत्री असताना त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले.

▪️काँग्रेस आघाडीची सत्ता असताना ते दोन वेळा उपमुख्यमंत्री झाले. 2019 च्या नोव्हेंबर महिन्यात अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयाने राज्याच्या राजकारणात भूकंप झाला होता. पुढे तीनच दिवसात त्यांनी वैयक्तिक कारण देत या पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर ते पुन्हा उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले.

▪️एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि अजित पवार विरोधी पक्षनेते झाले. त्यांतर जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शिंदे सरकारमध्येही ते उपमुख्यमंत्री होते. आता आज गुरुवारी पुन्हा एकदा ते महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत.

नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012
ऑक्टोबर 2012 ते सप्टेंबर 2014

सन 2019 : पहाटेचा शपथविधी, 23 ते 26 नोव्हेंबर 2019

डिसेंबर 2019 ते जून 2022

जुलै 2023 ते नोव्हेंबर 2024
डिसेंबर 2024 पासून पुढे कायम

▪️दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फार वेळ नसल्याने सुरुवातीला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी होणार असे सांगितले जात होते. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार, तसेच सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार, या तिघांव्यतिरिक्त मंत्रिमंडळातील काही सदस्यांचा शपथविधी होणार आहे. आज होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यात महायुतीतील घटक पक्षांचे किती मंत्री शपथ घेतील हे देखील समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे 12, शिवसेनेचे 7 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 7 असे एकूण 26 आमदार  मंत्रिपदाची शपथ घेतील, असे सांगितले

 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या