गुहागर तालुका वंचित बहूजन आघाडीच्या वतीने परभणी येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध. तहसीलदार साहेब,पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे गुहागर यांना निवेदन सादर
आबलोली (संदेश कदम)
परभणी महाराष्ट्र राज्य येथे दि.१०/१२/२०२४रोजी विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेच्या प्रतीकृतीची विटंबना करण्यात आली . १०/१२/२०२४रोजीच्या घटनेनंतर पोलिसांनी कोबिंग आँपरेशन करुन जिल्ह्यातील तरुणांना अटक करण्यात आली.सदर प्रकरणात शिक्षित तरुण सोमनाथ सुर्यवंशी याचा पोलिसांनी केलेल्या अमानुषपणे मारहानीत पोलिस कस्टडीतच त्याचा मृत्यू झाला. या जूल्मी घटने बद्दल व परभणी येथील प्रियदर्शनी नगर येथे राहाणाऱ्या वच्छला मानवदे या महीलेने पोलिसांच्या कोबिंग आँपरेशनचे मोबाईलव्दारे चित्रिकरण केले म्हणून कोबिंग आँपरेशन करणाऱ्या पोलिसांनी या महीलेला अमानुष मारहान करुन पोलिस ठाण्यात नेले तिथे देखील तिला अमानुषपणे मारहान करण्यात आली. अशा प्रकारे बेकायदेशीर कारभार करणाऱ्या पोलिस यंत्रेणेतील दोषीचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी व शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुंटूबांला योग्य तो न्याय मिळण्यासाठी तसेच संविधानाचा सन्मान ठेवावा या करीता गुहागर तालुका वंचित बहूजन आघाडीच्या वतीने तहसिलदार कार्यालय व गुहागर पोलिस ठाणे या ठिकाणी निवेदन देवून जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे गुहागर तालुका अध्यक्ष विशाल मोरे,महासचिव विनोद काळूराम पवार, कार्यकारणी सदस्य विजय पवार (कोषाध्यक्ष),सुदेश कांबळे (उपाध्यक्ष),शरद जाधव(प्रमुख सल्लागार), सुदेश मोहीते(सचिव) ,विद्याधर कदम व अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment