पाचेरी सडा येथील कु. ओंकार संतोष आंब्रे याची नासा इस्त्रो परिक्षेत गुहागर तालुका स्तरावर निवड.

आबलोली (संदेश कदम) 
गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा येथील जिल्हा परिषद शाळा पाचेरी सडा नं. १ या शाळेचा इयत्ता ५ वी मधील विद्यार्थी कु. ओंकार संतोष आंब्रे याने जिल्हा परिषद रत्नागिरी आयोजित "जाणू विज्ञान,अनुभवू विज्ञान"अंतर्गत नासा इस्त्रो परिक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. " जाणू विज्ञान, अनुभवू विज्ञान अंतर्गत "नासा इस्त्रो" परिक्षेत गुहागर तालुक्यातील परिक्षेस बसलेल्या तिन हजार विद्यार्थ्यांमध्ये ११९ वा क्रमांक प्राप्त करून कु. ओंकार संतोष आंब्रे यांने तालुका स्तरावर उज्वल यश संपादन केले आहे या त्याच्या यशाबद्दल जि. प. शाळा पाचेरी सडा नं.१ या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, मुंबईकर मंडळी, पाचेरी सडा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य कर्मचारी आणि गावातील ग्रामस्थांनी कु. ओंकार संतोष आंब्रे याचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments