*चिपळूणमधील अन्यायकारक पूररेषा रद्द करा, आमदार शेखर निकम यांची मागणी*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*


*चिपळूणमधील अन्यायकारक पूररेषा रद्द करा, आमदार शेखर निकम यांची मागणी* 

 चिपळूण शहर व परिसरातील गावांमध्ये जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरानंतर जलसंपदा खात्याच्यावतीने पुरेषा आखण्यात आली. सदर पुररेषा ही चिपळूण शहर व परिसरातील गावांवर ८०% प्रभावित करणारी ठरली. ही अन्यायकारक पूररेषा रद्द करावी, अशी मागणी चिपळुणचे आमदार शेखर निकम यांनी  विधानसभेत केली.
       
विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान बोलताना आमदार निकम म्हणाले, पुर रेषेच्या अनुषंगाने नगरविकास खात्याने पूररेषा प्रभावित निळ्या रेषा मधील क्षेत्रावर बांधकाम परवानग्यांवरती पूर्णता निर्बंध लादले आहेत. परिणामी ३ वर्ष चिपळूण शहर व परिसरातील गावांचा विकास खुंटला आहे. खुद्द नगरपालिकेला सुद्धा नागरिकांच्या मूलभूत सुविधा पुरवण्याकरता कोणतेही बांधकाम करता येत नाही. वास्तविक जलसंपदाच्यावतीने पूर रेषा ही कोणत्याही ठोस व वस्तू स्थितीनिष्ठ आकडेवारी शिवाय आखण्यात आलेली आहे. कोणतेही ठोस आकडेवारी नसताना घाई गडबडीमध्ये अन्यायकारक रेषा आखण्यात आलेली आहे.
       
गेले तीन वर्ष जलसंपदा खात्याच्यावतीने वाशिष्टी व शिव नदीतील जवळपास १६ लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे. त्यामुळे गेले तीन वर्षे चिपळूणमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली नाही. म्हणून आपणास विनंती आहे की,  पूर रेषेचा पुन्हा सर्वे व्हावा. तसेच नगर विकास खात्याच्यावतीने नव्या बांधकाम वरती असलेले निर्बंध काही अटी व शर्ती वरती शिथिल करावे व बांधकाम परवानग्या अदा कराव्यात जेणेकरून येत्या दोन वर्षात दीडशे वर्षे पूर्णत्वाकडे जात असलेले चिपळूण शहर तुम्हा आम्हाला वाचवता येईल.
      
आमदार निकम म्हणाले, सुधारीत कर आकारणीबाबत चिपळूण नगरपरिषद प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीबाबत शहरवासियांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी,संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून स्थानिक पदाधिकारी/लोकप्रतिनिधी अथवा नागरिकांना विश्वासामध्ये न घेता कर आकारणी करुन अतिरिक्त वस्तुस्थिती विचारात न घेता निव्वळ शासनाचे उद्दीष्ट पूर्ण करणे हा हेतु समोर ठेवून सर्वसामान्य करदात्यांना वाढीव कराच्या ओझ्याखाली घेतले आहे.
      
मोठे व्यवसायिक आस्थापना यांना भाड्याची कर आकारणी करुन कराचे उत्पन्नवाढ ही योग्य पध्दत आहे, मात्र चिपळूण नगरपरिषदेने २०२१ च्या महापूरामध्ये पुर्णपणे उध्वस्त झालेला व्यापारी, ज्यांची घरदारे यांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यांनी सुरक्षीततेच्या दृष्टीने छप्पराची दुरुस्ती केली आहे, अशा नागरिकांना वाढीव कर आकारणी करुन उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ही बाब शहरवासियांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे, हे सर्व थांबले पाहिजे. आणि चिपळूण नगरपरिषदेच्या कर आकारणीकरिता लावलेले कार्पोरेट सिटी समान दर याला देखील स्थगिती देवून छोट्या शहरासाठी लावलेले कर आकारणीचे दर हे राज्यातील मोठ्या शहरांना लागू असलेले आहेत. त्यामध्ये फेरबदल होऊन कोकणातील भौगोलिक परिस्थिती, आर्थिक स्थिती, राहणीमान विचारात घेऊन चिपळूण समान राज्यातील इतर शहरांमध्ये कर आकारणीचे वाजवी दरानुसार कर आकारणी केल्यास योग्य होणार आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments