*उरणमधील करंजा येथील ११ वर्षीय जलतरणपटू मयंक म्हात्रे याने रचला इतिहास;*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*


*उरणमधील करंजा येथील ११ वर्षीय जलतरणपटू मयंक म्हात्रे याने रचला इतिहास;*

*ठरला पहिला जलतरणपटू* 

अलिबाग:---रायगड जिल्ह्यातील उरण, करंजा येथील जलतरणपटू मयंक म्हात्रे याने घारापुरी बंदर ते करंजा जेट्टी हे सागरी 18 किमीचं अंतर निर्धारीत वेळेपेक्षा कमी वेळेत पोहून पार केलं आहे. त्यामुळे त्याने पुन्हा एकदा नवा इतिहास घडविला आहे. मयंकने ३ डिसेंबर २०२३ ला धरमतर ते करंजा हा प्रवाह पोहून पार केला होता.

  ज्यामुळे तो हा प्रवाह पोहून जाणारा पहिला जलतरणपटू ठरला होता. तर यावेळी घारापुरी ते करंजा जेट्टी हा प्रवाह पोहून जाणारा मयंक पहिला जलतरणपटू ठरला आहे. 

  त्याने या निमित्ताने नवा इतिहास रचला असल्याचे त्याच्या प्रशिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. उरणच्या सेंट मेरीज कॉन्व्हेट शाळेतील सहाव्या इयत्तामध्ये शिकणारा मयंक हा उत्कृष्ट जळतरणपटू आहे.

  समुद्रीय जलतरण हा त्याचा आवडता प्रकार आहे. मयंकने आजवर अनेक स्पर्धांमधून यश संपदान केले आहे. मात्र समुद्रीय जलतरण हे त्याला मोठे यश आणि प्रसिद्धी देणारे ठरले आहे.*

समुद्र किनारी लागून असणाऱ्या करंजा, कोंढारीपाडा येथे राहणाऱ्या या 11 वर्षीय चिमुकल्याने आज नवा विक्रम केला आहे. 

 मंगळवार ३ डिसेंबरच्या मध्यरात्री १:०४ मिनिटांनी मयंकने जगविख्यात घारापुरी बंदर येथून समुद्राच्या लाटांना आव्हान देत करंजा जेट्टी गाठली आणि पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित केला. सागरी १८ किमी अंतर त्याने निर्धारीत वेळेपेक्षा अर्धातास आधी पोहून पूर्ण केले आहे.

  हा प्रवाह पोहून जाण्यासाठी ६ तासांचा अवधी अपेक्षित होता. तर मयंकने हे अंतर ५ तास २९ मिनिटात पोहून पार करत सर्वांनाच चकीत केले आहे. त्याने केलेल्या या प्रयत्नाने घारापुरी ते करंजा हा प्रवाह पोहून पार करणारा तो पहिला जलतरणपटू ठरला आहे.

  याच प्रमाणे मागील वर्षी याच दिवशी म्हणजे ३ डिसेंबर २०२४ ला त्याने धरमतर ते करंजा हे १८ किमी अंतर पोहून पार करत तो प्रवाह पोहून पार करणारा पहिला जलतरणपटू म्हणून आपले नाव कोरले होते. 

 त्यामुळे रायगड, मुंबई विभागातील समुद्रीय जलप्रवाहातील दोन प्रवाहांवर मयंकने आपले नावं कायमस्वरूपी कोरले आहे.*

मयंकने केलेल्या विक्रमनंतर अनेकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. तर यावेळी मयंकचा सत्कार शेकापचे युवा नेतृत्व प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष राजू कोळी, संघटनेचे निरीक्षक शैलेश सिंग, समाजसेवक सचिन डाऊर, नितीनभाऊ कोळी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थितीहोती. मयंकने आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आपले आई-वडील, मार्गदर्शक किशोर पाटील, प्रशिक्षक हितेश भोईर यांना दिले आहे. तर उरण तालुका हौशी जलतरण संघटनेचे सचिव सुनील पाटील, मनोहर टेमकर, जलतरणपटू जयदीप सिंग, आर्यन मोडखरकर, वेदांत पाटील, रुद्राक्षी टेमकर, आर्य पाटील यांचे सहकार्य त्याच्या या विक्रमादरम्यान त्याला लाभले.*
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments