*प्राचीन कोकण म्युझियममध्ये कोकण चित्र प्रदर्शन ठरतेय पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*प्राचीन कोकण म्युझियममध्ये कोकण चित्र प्रदर्शन ठरतेय पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र*
गणपतीपुळे येथील प्राचीन कोकणच्या २० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्राचीन कोकण म्युझियममध्ये कोकण चित्र प्रदर्शन तयार करण्यात आले आहे. यामध्ये २ फुट x ३ फूट च्या पेंटींगपासून ४ फूट x ८ फुट अशा भव्य चित्रांचा समावेश आहे. या चित्रांमधून कोकणचे सण , समारंभ, चित्रकथा सारख्या पारंपरिक कला, व्यवसाय यांचे सुंदर दर्शन घडविले आहे.
सिंधुदुर्ग मधील प्रसिद्ध चित्रकार वेंगुर्लेकर आणि मंडणगड (रत्नागिरी ) येथील चित्रकार प्रणव फराटे यांनी ही चित्रे साकारली आहेत. पर्यटकांसाठी हे प्रदर्शन आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.
गणपतीपुळे येथील प्राचीन कोकण म्युझियम हे महाराष्ट्रातील ओपन एअर म्युझियम आहे. गणपतीमुळे येथे तीन एकर जागेवर ५०० वर्षांपूर्वीच्या कोकणी खेड्याची इतिहास, परंपरा, संस्कृती , वेशभूषा दाखवणारे संपूर्ण गावच वसविण्यात आले आहे . हिरव्यागार देवराईमध्ये पुरातन जांभ्या दगडाच्या पाखाडीतून पक्षांचा किलबिलाट ऐकत आपण गावात प्रवेश करतो. म्युझियमची स्वागतिका प्रत्येक ग्रुपबरोबर म्युझियम दाखविण्यासाठी आपल्या येतात. मराठी, हिंदी आणि इंग्रजी मध्ये कोकणचा इतिहास उलगडून दाखवतात. उतरत्या छपरांची घरे , लाल चुटूक मातीच्या वाटा, झूळूझूळू वहाणारे पाटाचे पाणी अशा वातावरणात आपले मन इतिहासात अगदी रमून जाते. इथे १४० पेक्षा जास्त प्रकारची औषधी व दुर्मिळ वनस्पतींचा संग्रह आहे. वाटेत बकुळीच्या फुलांचा सडा तर कधी सुरंगीच्या फुलांचा दरवळ येतो. इथले स्पाईस गार्डन काळीमीरी, बुशमीरी, दालचीनी, तमालपत्र, लवंग, वेलची, ऑलस्पाईस, त्रिफळ, जायफळ अशा विविध मसाल्याच्या झाडांनी समृद्ध आहे.
गणपतीपुळे प्राचीन कोकण येथील हस्तकला विक्री केंद्रामध्ये तर कोकणातील शेकडो प्रकारच्या हस्तकौशल्याच्या वस्तू आहेत. प्राचीन कोकण येथे मैत्रेयी हँडीक्राफ्ट नावाने लाकडी खेळणी बनवली जातात. शंखप्रदर्शनाचे सर्वात मोठे आकर्षण आहे. प्राचीन कोकण येथे १६० पेक्षा जास्त प्रकारच्या शंखांचे प्रदर्शन असून त्यामध्ये पुजेचे शंख, दुर्मिळ शंख , शोभेचे शंख तसे दोन फुट लांब असे विविध शंख पहायला व खरेदी करायला मिळतात प्राचीन कोकण म्युझियम हे कोकणातील सर्वांत लोकप्रिय म्युझियम असून लाखो पर्यटक दरवर्षी येथे भेट देतात अशी माहिती वैभव सरदेसाई व स्वरुपा सरदेसाई यांनी दिली.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment