फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनकडून विकलांग दिन उत्साहात संपन्न.
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनकडून विकलांग दिन उत्साहात संपन्न.
गेली ७ वर्षे फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन विकलांग मुलांसाठी पुनर्वसन केंद्र चालवत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 200 पेक्षा जास्त विकलांग मुलांची तपासणी करून त्यांना वेळोवेळी न्यूरो सर्जन, ऑर्थोपेडिशियन, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, ऑर्थोटिस्ट्स आणि ऑप्टोमेट्रिस्ट यांचा समावेश असलेल्या पुण्यातील नामांकित रुग्णालयांमधील संचेती हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर आणि एचव्ही देसाई नेत्र रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या तज्ञांच्या टीमने शिबिरांचे आयोजन करून सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांची तपासणी केली. एप्रिल २०१७ या सीपी मिशनच्या फिनोलेक्स कॉलनी, झाडगाव, रत्नागिरी येथील पुनर्वसन केंद्राची सुरूवात झाली.
त्यांनी फिजिओथेरपिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट नियुक्त केले आहेत जे दररोज त्यांच्या सेवा प्रदान करतात. तसेच रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाचेही सहकार्य लाभले व पुढेही यापेक्षा चांगले सहकार्य लाभेल अशी आशा बाळगतो.
तसेच पुनर्वसन केंद्रात स्वयंरोजगार निर्मिती प्रशिक्षण केंद्राची देखील स्थापना करण्यात आली आहे मुलांसहित पालकांनाही या प्रशिक्षणाचा लाभ उत्तम प्रकारे होत आहे. त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
कोविडच्या कालावधीमध्ये ही या केंद्राला खंड न पडता ऑनलाइन थेरिफिकेशन,लोकल चॅनेल वरून सुरुवात केली गेली. तसेच skype, व्हाट्सअप, झूम यांसारख्या सहकार्याने मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. या केंद्रात येणाऱ्या प्रत्येक मुलांचा वाढदिवस, वेगवेगळे भारतीय सण साजरे केले जातात त्यांच्या सुखदुःखामध्ये यामध्ये सामील होऊन हे केंद्र आता आठच्या वर्षाकडे वाटचाल करत आहे. तसेच दरवर्षी या मुलांची व पालकांची सहलही काढण्यात येते त्यांना विविध खेळ, मनोरंजनाचे कायक्रम करून खाऊ वाटप करण्यात येते.
यावर्षीतर या मुलांबरोबर मुकुल माधव विद्यालयाच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. याआधीही ह्या मुलांना आशादीप, अनुसया सारख्या संस्थामध्ये जाऊन सामाजिक बांधिलकीची जाणीव केली आहे.
आतापर्यंत मुकुल माधव फाउंडेशने 9500 पेक्षा जास्त थेरेपी, शस्त्रक्रिया व उपजीविके करता मदत केली असून 300 पेक्षा जास्त शिबिर आयोजित करून 11 पेक्षा जास्त पुनर्वसन केंद्र महाराष्ट्र गोवा व गुजरात येथे कार्यरत आहेत. तसेच 35 पेक्षा जास्त विकलांग संस्थांना पूर्ण भारतभर मुकुल माधव फाउंडेशन वेगवेगळ्या रूपात मदत करत आहे.
दि . ०३ डिसेंबर रोजी जागतिक विकलांग दिन मोठ्या उत्साहात करण्यात आला. विकलांग मुले समाजाचा एक अविभाज्य घटक आहेत त्यांना समाजात वावरताना कोणतीही समस्या येणार नाही व ही मुले सरळ सोपी जीवनशैली अंगी करतील असा मुकुल माधव फाउंडेशनचा संकल्प आहे. त्यामुळेच मुकुल माधव विद्यलयाच्या विद्यार्थ्यांबरोबर ही मुले संगीत, गायन, चित्रकला अशा विविध करमणुकेच्या च्या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंदी झाले. कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, डॉ. गावडे, शिक्षक फिनोलेक्स कडून अधिकारी वर्ग उपस्थित होता. पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या नियोजनाबद्दल पालक वर्गातून व विद्यार्थी वर्गातून मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. रितू प्रकाश छाब्रिया यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. व फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे ही आभार मानले.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment