गुहागर तालुक्यातील तळवली हायस्कूलमध्ये 'वीर बालदिन' उत्साहात साजरा
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या प्रशालेत दि. 26 डिसेंबर 2024 रोजी 'वीर बालदिन' साजरा झाला.
प्रारंभी प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री. साळुंके सर यांच्या हस्ते मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांचे स्वागत केले.त्यानंतर प्रशालेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.श्रीनाथ कुळे सर यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकेतून त्यांनी या दिवसाचे महत्व स्पष्ट केले. त्यानंतर मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांनी 'वीर बालदिन' का साजरा केला जातो, त्याचे महत्त्व काय आहे. या विषयी माहिती दिली. शीख धर्माचे दहावे गुरू गोविंदसिंग यांच्या दोन लहान मुलांना वीर मरण आले. त्यांचे स्मरण व्हावे. तसेच बालकांचा सन्मान झाला पाहिजे. त्याविषयी विद्यार्थ्यांना योग्य माहिती मिळावी,हा उद्देश या मागे असल्याचे त्यांनी सांगितले.
वीर बाल दिनानिमित्त प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन केले होते. चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा या सारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.तसेच शासनाने दिलेल्या लिंकच्या माध्यमातून प्रोजेक्टर लावून शासनाने आयोजित केलेला कार्यक्रम लाईव्ह दाखवण्यात आला. तसेच पुष्पगुच्छ देऊन बालकांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास जेष्ठ शिक्षक श्री. साळुंके सर, श्री देवरुखकर सर, श्री. कुळे सर तसेच विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी झाले होते.शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Comments
Post a Comment