*अभय योजनेतून ३ हजार कोटींच्या महसुलाची अपेक्षा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*अभय योजनेतून ३ हजार कोटींच्या महसुलाची अपेक्षा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती*
३१ मार्च २०२५ पर्यंत कर भरल्यास व्याज आणि दंड माफी
राज्याच्या महसूल वाढीसाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले असून सन २०१७ ते २०२० या दरम्यानच्या तीन आर्थिक वर्षात वस्तू आणि सेवाकर मागण्यांशी संबंधित व्याज किंवा दंड माफीसाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत तीन हजार कोटीच्या महसुलाची भर पडणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत दिली. या अभय योजनेची मुदत ३१ मार्च २०२५ अशी असून तत्पूर्वी करभरणा केल्यास कर मागण्यांशी संबंधित व्याज आणि दंड माफ होणार असल्याने व्यापाऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.
राज्य प्राधिकरणाच्या अखत्यारीतील करदात्यांकडून साधारण १ लाख १४ हजार अर्ज अपेक्षित आहेत. विवादित रक्कम ५४ हजार कोटी रुपयांची आहे. त्यापैकी विवादित कर २७ हजार कोटी रुपयांचा तर दंड आणि शास्तीची रक्कम २७ हजार कोटी रुपयांची आहे. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता विवादित कराच्या सुमारे २० टक्के रक्कम योजनेमध्ये जमा होते. त्यानुसार या योजनेमध्ये सुमारे ५ हजार ५०० कोटी ते सहा हजार कोटी रुपये विवादित कर रक्कम जमा होणे अपेक्षित आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.
विवादित कर रक्कमेपैकी अर्धी रक्कम म्हणजे २ हजार ७०० कोटी ते ३ हजार कोटी रुपये राज्य सरकारला मिळतील आणि उर्वरित रक्कम केंद्र सरकारकडे जमा होईल. या योजनेमुळे व्यापाऱ्यांना सुमारे ५ हजार ५०० ते सहा हजार कोटी रुपयांच्या व्याज आणि दंडातून दिलासा मिळेल. या अभय योजनेची माहिती करदात्यांना, वकिलांना, सनदी लेखापाल, नागरिकांना होण्यासाठी व्यापक प्रसिद्धी करण्यात येत असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment