सुरजागड लोह खनिज वाहतूकीने पांढरे सोने झाले लाले लाल शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी

सुरजागड लोह खनिज वाहतूकीने पांढरे सोने झाले लाले लाल 
By- दिपक चुनारकर 
सुरजागड लोह खनिज वाहतूकीने पांढरे सोने झाले लाले लाल सूरजागड लोह खनिज वाहतूक ही रस्ते मार्गे, वेलगूर टोला,बोटलांचेरु, विजयपूर, तानबोडी,खमांचेरू, सुभाषनगर. मुत्तापूर, बोरी, लगाम, शान्तिग्राम मार्गे चंद्रपूर कडे चालू आहे. वाहतूक करताना ट्रॅकाचा वापर केला जातो.
ट्रॅकवर नामात्र ताडपत्री चा वापर लोहखनिज झाकन्यासाठी केला जातो. वाहतूक वेळी लोहकनीक बाहेर उडून रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात उडून सर्व पिकावर पसरल्यामुळे सर्व पिकावर लाल रंगाचा थर साचून पिकाचे नुकसान होत आहे.
आधीच पावसा अभावी कापूस पिकाचे  उत्पादन कमी झाले, त्यातच लोहखनिजामुळे पांढरे सोने लाले लाल झाल्यामुळे अल्प दरात विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. लोहकंपनीने त्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

Comments