*येणाऱ्या 2025 नवीन वर्षात 7 सुट्ट्यांचे नुकसान*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*येणाऱ्या 2025 नवीन वर्षात 7 सुट्ट्यांचे नुकसान*
*दिवाळीत 9 सुट्ट्यांची सलग साखळी सहलीसाठी उपयुक्त*
▪️2024 वर्ष संपायला अवघे काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे नवीन वर्षाबाबत सर्वत्रच औत्सुक्याचे वातावरण पहायला मिळते. विशेषतः सुट्ट्यांचे काय चित्र असेल, याबाबत सरकारी कर्मचाऱ्यांना आतुरता असणे अगदी स्वाभाविकच आहे . परंतु येणाऱ्या 2025 या नवीन वर्षात त्यांचा भ्रमनिरास होणार असून एकूण 7 सुट्ट्यांचा नुकसान होणार आहे.
▪️2024 सालचा डिसेंबर हा अंतिम मास असून या मासाची 9 तारीख उजाडली असून आणखी काही दिवसांनी जुन्या वर्षाला निरोप देण्याची धांदल सुरू असेल. अनेक महत्त्वपूर्ण घटनांनी हे वर्ष संस्मरणीय ठरले आहेत. चांद्रयान, आदित्य एल १, भारत जगातील अगोदर पाचवी व नंतर चौथी आर्थिक महासत्ता, अशा कितीतरी घडामोडी घडल्या.
▪️लोकसभेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली, महाराष्ट्र विधानसभेची पंचवार्षिक निवडणूक याच वर्षात नुकत्याच पार पडल्या. अर्थ, क्रीडा, अध्यात्म, बाजार, आरोग्य, यासारख्या विविध क्षेत्रांत अनेक लक्षणीय घडामोडी झाल्या.नवीन वर्ष एकविसाव्या व्या शतकाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून या वर्षाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.नवीन वर्षात मागील दोन ते तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचे संकेत आहे.राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगर पालिका, नगरपालिका,नगरपंचायत, ग्रामपंचायती अशा कितीतरी निवडणुका झालेल्या नाहीत. याबाबत जनतेत उत्सुकता आहे.
▪️दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाबाबत औत्सुक्य असते ते प्रामुख्याने सार्वजनिक सुट्ट्यांच्या अनुषंगाने. वर्षभरात किती सुट्ट्या व त्या सलग येत असतील तर छोट्या कौटुंबिक सहली काढता येऊ शकतात काय?याचे गणित मांडणे, हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय, पुढील वर्षाच्या दिनदर्शिका बाजारात आल्या असून त्याचे अवलोकन केले असता, एकूण सात सुट्ट्यांवर गंडांतर आलेले आहे.
▪️शासनाने जाहीर केलेल्या वर्षभरातील सुट्ट्या 24 आहेत. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक सण-उत्सव व परिस्थिती पाहून सुट्ट्यांचे अधिकार आहेत. वर्षाच्या सुरुवातीला हक्काची सुट्टी म्हणजे प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीची. यंदा हा दिवस रविवारी आला आहे. त्यामुळे एका सुट्टीचा तोटा नमनालाच झाला आहे. मराठी नवीन वर्ष गुढी पाडव्याला सुरू होते. हा सण सुद्धा 30 मार्च रविवारीच आला आहे.रामनवमीसुद्धा रविवारीच असून मुस्लिम बांधवांचा मोहरम हा सण सुद्धा रविवारीच येतो आहे. तर बकरी ईद शनिवारी असल्याने ती सुट्टीसुद्धा बुडाली आहे. तर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि पारशी नववर्ष एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे पारशी नववर्षाची सुट्टी बुडाली. तर दसरा आणि महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबरला एकाच दिवशी आले आहेत त्यामुळे दसऱ्याची सुट्टी बुडाली आहे.
▪️ऑक्टोबरमध्ये दिवाळी असून 18 रोजी शनिवारी धनत्रयोदशी आहे. रविवारी सुट्टी असून सोमवारी 20 रोजी नरक चतुर्दशी आहे. 21 रोजी लक्ष्मीपूजन तर 22 रोजी बलिप्रतिपदा तसेच पाडव्याची सुट्टी आहे. 23 रोजी भाऊबीज व 24 रोजी शुक्रवार आहे. या दोन दिवसांच्या रजा तडजोड केल्यास 25 व 26 रोजी विकेंडच्या सुट्ट्या आहेत. अशा प्रकारे सलग ९ सुट्ट्यांची संधी सहलीसाठी साधता येऊ शकते.
*👉लागून येणाऱ्या सलग सुट्ट्या*
▪️मार्चमध्ये 14 रोजी शुक्रवारी धूलिवंदन आहे. त्यामुळे शनिवार, रविवार अशी साखळी मिळते. दि. 30 मार्च रोजी रविवारी गुढीपाडवा असून 31 रोजी रमजान ईद आहे. शनिवारची सुट्टी धरता तीन दिवस सलग सुट्ट्या मिळतात. एप्रिलमध्ये 12 रोजी शनिवारी हनुमान जयंती, 13 रोजी रविवार व 14 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. अशा प्रकारे दोन ते तीन दिवसांच्या सुट्ट्यांची संधी साधता येईल.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment